आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरूच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमद्ये एका विद्यार्थ्याने विद्यार्थिनीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपीने स्वतःलाही चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो बचावला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर व मृत विद्यार्थिनी दोघेही कोलार नामक एकाच गावचे आहेत. घटनेचे कारण अजून समजले नाही.
या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यात कॉलेज कॅम्पसमध्ये तैनात सुरक्षा कर्मचारी जखमी विद्यार्थिनीला उचलून अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. तर पुढे चालणारा सुरक्षा रक्षक शिट्टी वाजवून रस्ता मोकळा करताना दिसून येतो. त्याच्या मागे काही सुरक्षा कर्मचारी विद्यार्थिनीला घेऊन येत आहेत.
हल्लेखोराने स्वतःवरही केले वार
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 2 जानेवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली. प्रेसिडेन्सी कॉलेजच्या परिसरात बीटेकचा विद्यार्थी पवन कल्याणने 19 वर्षीय विद्यार्थिनी लयस्मिथा हिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात लयस्मिथा गंभीर जखमी झाली. त्यानंतर पवनने स्वतःवर चाकूचे वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थिनी व हल्लेखोर एकाच गावचे
यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी विद्यार्थिनीला मृत घोषित केले. तर हल्लेखोरी प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पवन व विद्यार्थिनी कोलार शहरातील एकाच गावात राहात असल्याचे आतापर्यंत तपासात स्पष्ट झाले आहे. दोघेही वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिक्षण घेतात. पण पवनने हे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तपास सुरू आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गत ऑक्टोबर महिन्यात चेन्नईच्या सेंट थॉमस माउंट रेल्वेस्थानकावर सत्यप्रिया नामक विद्यार्थिनीची चाकू मारून हत्या करण्यात आली होती. सत्यप्रिया बीकॉमची विद्यार्थिनी होती. तिच्यावर 23 वर्षीय सतीश नामक आरोपीने हल्ला केला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.