आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशची राजधानी येथे गुरुवारी एक भीषण दुर्घटना घडली. येथील 6 मजली कारखान्यात आग लागली. या अपघातात 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 30 लोक जखमी झाले आहेत आणि बरेच अजूनही बेपत्ता आहेत. जीव वाचवण्यासाठी बर्याच लोकांनी पेटलेल्या इमारतीतून खाली उडी मारली. कारखान्याच्या वरच्या मजल्यावर आग लागली. आतमध्ये किती लोक अडकले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, कारखान्यात अडकलेल्या लोकांचे जीव वाचणे अवघड असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रूपगंज परिसरातील फूड अँड बेव्हरेज कारखान्यात आग लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. अग्निशमन विभाग आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की आतापर्यंत 25 जणांना वाचवण्यात आले आहे. किती मृत्यू झाले याबद्दल काही सांगता येत नाही. एकदा आग विझल्यानंतर कारखान्याच्या आत शोध मोहीम राबवली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक लोक आगीमुळे जळाले आहेत आणि अनेल लोक इमारतीवरुन उड्या मारल्याने जखमी झाले आहेत.
अपघातावेळी डझनभर कामगार फॅक्टरीत उपस्थित होते
एका कामगारने सांगितले की, आग लागली तेव्हा डझनभर कामगार कारखान्यात उपस्थित होते. सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे बांगलादेशात आगीच्या घटना सामान्य आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ढाका येथेच काही अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. या अपघातात 70 जणांना आपला जीव गमवला होता.
पायऱ्यांवर दरवाजे बंद होते
एका मजुराने सांगितले की, तिसऱ्या मजल्यावर जेव्हा आग लागली, तेव्हा पायऱ्यांवरील दोन्हीही बाजूचे दरवाजे बंद होते. या दरम्यान त्या मजल्यावर 48 लोक होते. मला माहित नाही की त्यांचे काय झाले. दुसर्या मजुराने सांगितले की, आग लागल्यानंतर 13 कामगार छताकडे धावले आणि पाहता पाहता सगळीकडे धूर पसरला. घटनास्थळी असलेल्या नजरुल इस्लाम यांनी सांगितले की, ते दुर्घटनेची बातमी ऐकूण आले. ते आपल्या भाच्याला शोधत होते, जो फोन उचलत नव्हता. आता त्याचा फोनही लागत नाहीये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.