आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bangladeshi Militants Infiltrate Under Tourist, Medical Visas, Members Of Al Qaeda

अतिरेक्यांचे नवनवे डावपेच:टुरिस्ट, मेडिकल व्हिसाच्या आडून देशात बांगलादेशी अतिरेक्यांची घुसखोरी

गुवाहाटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बांगलादेशातील जिहादी अतिरेकी भारतात घुसण्यासाठी नवनव्या पद्धती अवलंबत आहेत. आसाम पोलिसांनी नुकतीच अटक केलेल्या काही जिहादी अतिरेकी आणि मुजाहिदीनांच्या चौकशीत महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. बांगलादेशहून आसाममार्गे भारतात घुसण्यासाठी मेडिकल आणि टुरिस्ट व्हिसाचा ते वापर करत आहेत. मित्रदेश असल्याने बांगलादेशातील नागरिकांना असा व्हिसा मिळवणे सोपे जाते.

साधारणपणे अतिरेकी पाकिस्तान किंवा बांगलादेशाच्या सीमेतून घुसखोरी करून भारतातील विविध राज्यांपर्यंत पोहोचतात. त्यानंतर देश विरोधी कारवाया करतात. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरशिवाय पूर्वोत्तर राज्यांमध्ये सुरक्षादलाकून होत असलेल्या कठोर चौकशीमुळे अतिरेक्यांच्या मनसुब्यांना लगाम लागला आहे. दरम्यान, आसामच्या खालच्या भागातील काही जिल्ह्यांत पोलिसांनी अनेक अतिरेक्यांची धरपकड करण्यात यश मिळवले आहे. हे अतिरेकी बांगलादेशातील आणि अलकायदाशी संबंधित जिहादी संघटनांचे सदस्य निघाले. बांगलादेशातील बहुतांश जिहादी सदस्यांचे म्होरके कुख्यात पाकिस्तानी एजन्सी आयएसआयमध्ये बसलेले आढळले. हरकत-उल-मुजाहिद्दीनच्या आधी पकडल्या गेलेल्या अनेक सदस्यांनी पाकिस्तानहून बांगलादेश आणि नंतर आसाममार्गे भारतात घुसल्याचे समोर आले आहे.

अतिरेकी ३ रस्त्यांनी घुसखोरी करतात : आहेत. सुरक्षा दलाला चाहूल लागल्यावर दुसरा रस्ता पकडतात. साधारणपणे पूर्वोत्तरच्या कोणत्याही सीमावर्ती राज्य आणि तेथून आसाममार्गे देशातील इतर भागात पोहोचण्यासाठी अतिरेकी तीन भागातील दुर्गम रस्त्यांचा आधार घेतात. ती आहेत- चटगाव हिल ट्रॅक (सीएचटी) वरून बांगलादेशातून त्रिपुरा आणि मिझोरम किंवा मणिपूरमधून प्रवेश. दुसरा रस्ता डीमा हासाऊ जिल्ह्यातून घुसतात. एनएससीएन (आयएम) सारख्या अनेक संघटना याच रस्त्यावरून घुसखोरी करतात. तिसरा गारो हिल्सचा मार्ग थोडा सोपा आहे. जिहादी सहसा दोन रस्त्यांचा वापर करत नाहीत. त्याऐवजी ते करीमगंज आणि गारो हिल्सच्या सोप्या रस्त्याने येतात.

५ वर्षांत बांगलादेश सीमेवर सर्वाधिक घुसखोरी
बीएसएफच्या ताज्या माहितीनुसार बांगलादेश आणि पाकिस्तानमधून २०२१ मध्ये मागील ५ वर्षांत सर्वाधिक घुसखोरी झाली. २०१७ पासून २०२१ ६,७१२ घुसखोर पकडले गेले. यातील २६८ भारत-बांगलादेश सीमेतून घुसखोरी करताना पकडले गेले. केवळ २०२१ मध्ये पाकिस्तान सीमेतून ४५, तर बांगलादेश सीमेवरून १,५८३ घुसखोर पकडले गेले.

अतिरेकी ३ रस्त्यांनी घुसखोरी करतात
गुप्तचर सूत्रांच्या मते अनेक वर्षांपासून जिहादी बांगलादेशातून भारतात येण्यासाठी नेहमीच्या रस्त्यांचाच वापर करत आले

बातम्या आणखी आहेत...