आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँकेने कर्जाची फाईल मंजुर न केल्याने एका पठ्ठ्याने चक्क बँकेला आग लावली आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यात ही घटना घडली असून, बँकेने कर्जाची फाईल रिजेक्ट केल्यानंतर रागाच्या भरात एका युवकाने बँकेला आग लावली आहे. वसीम हजरतसाब मुल्ला असे बँकेला आग लावणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो रतिहल्ली येथील रहिवासी असल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वसीमने कॅनरा बँकेत कर्जासाठी फाईल टाकली होती. मात्र त्याचे CIBIL स्कोर कमी असल्याच्या कारणावरुन याची फाईल कर्जासाठी अपात्र ठरली. त्याचे राग मनात धरत वसीम हा शनिवारी बँकेत पोहोचला त्यानंतर त्याने बँकेची एक खिडकी उघडल्यानंतर बँकेच्या आत पेट्रोल ओतले आणि काडी लावली. काही वेळानंतर बँकेच्या समोरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांनी पाहिले असता, बँकेतून धूर निघत असल्याने त्यांनी तात्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
12 लाखांचे नुकसान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीच सुमारे 12 लाखांचा सामान जळून खाक झाला आहे. त्यात पाच संगणक, पंखे, लाईट, पासबुक प्रिंटर, कॅश काउंटिंग मशीन, कागदपत्रे, CCTV सह कॅश काउंटर जळून खाक झाले आहे. पोलिसांनी आरोपी वसीमला ताब्यात घेतले आहे.
CIBIL स्कोर काय असतो
CIBIL स्कोर हा तीन अंकी नंबर असतो, जो आपल्या खात्याच्या तपशीलावर अवलंबुन असतो. हा क्रेडिट स्कोर 300 ते 900 या दरम्यान असतो. जितका जास्त आपला स्कोर असतो, तितकेच जास्त आपली क्रेडिट रेटिंग असते. जास्त क्रेडिट स्कोर असल्यामुळे सहाजिक आपल्याला जास्तीचे कर्ज बँककडून देण्यात येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.