आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंक हॉलिडे:ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बॅंकांचे कामकाज बंद राहील; कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. ऑक्‍टोबरमध्‍ये तुमच्याकडे बॅंकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर या महिन्‍यात येणार्‍या बँकेच्‍या सुट्ट्‍या जाणून घ्या. त्यानुसार नियोजन करा, कारण या महिन्यात दिवाळी, नवरात्री, दसरा या सणांमुळे विविध ठिकाणी एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबरच्या बँक हॉलिड लिस्ट बाबत जाणून घेऊया...

ऑक्टोबर महिन्यातील बॅंक सुट्टीची यादी

दिनांकबॅंका बंद राहण्याचे कारणकुठे बंद राहणार बॅंका
1बॅंकेची हाफ-ईयरली क्लोजिंग सुटीगंगटोक
2रविवार आणि गांधी जयंतीसगळीकडे
3दुर्गा पूजा महाअष्टमीआगरतळा, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा आणि रांची
4दुर्गा पूजा/दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/श्रीमंत शंकरदेवांचा जन्मोत्सवआगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, शिलाँग आणि तिरुअनंतपूर
5दुर्गा पूजा/दसरा (विजयादशमी)/ श्रीमंत शंकरदेव यांचा जन्मोत्सवसभी जगह
6दुर्गा पुजागंगटोक
7दुर्गा पूजागंगटोक
8दुसरा शनिवार मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (मोहम्मद पैंगबर यांचा जन्मदिवस)सगळीकडे
9रविवारसगळीकडे
13करवा चौथशिमला
14ईद-ए-मिलाद-उल-नबी यांच्या जन्मदिनानंतरचा शुक्रवारजम्मू आणि श्रीनगर
16रविवारसगळीकडे
18कटि बिहूगुवाहाटी
22चौथा शनिवारसगळीकडे
23रविवारसगळीकडे
24काली पूजा/दीवाळी/दिवाळी लक्ष्मी पूजन/नरक चतुर्दशीगंगटोक, हैदराबाद आणि इम्पाळ सोडून सगळीकडे
25लक्ष्मी पूजा/दीपावली/गोवर्धन पूजागंगटोक, हैदराबाद, इंफाल आणि जयपुर
26गोवर्धन पूजा/विक्रम संवंत नव वर्ष दिवस/भाई बिज/भाई दूज/दीपावली (बाली प्रतिपदा)/लक्ष्मी पूजा/प्रवेश दिवसअहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहरादून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, शिमला आणि श्रीनगर
27भाऊबीद / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दिवाळी /गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनऊ
30रविवारसगळीकडे
31सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती/सूर्य षष्ठी/ छठ पूजाअहमदाबाद, पटनाआणि रांची

विशेष सूचना - विविध राज्यांमध्ये विविध कारणांमुळे बँका बंद राहतील. त्यासाठी RBI यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

22 ते 24 ऑक्टोबरपर्यंत बँक बंद

  • 22 ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत बँका सर्वत्र बंद राहणार आहेत. 22 रविवार आणि 23 तारखेला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील, तर 24 ऑक्टोबरला दिवाळीमुळे गंगटोक, हैदराबाद आणि इम्फाळ वगळता इतर सर्व ठिकाणी बँका सुरू राहणार नाहीत.
  • गंगटोकमध्ये 4 ते 9 ऑक्टोबरपर्यंत बँक बंद गंगटोकमध्ये 4 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत सलग 6 दिवस बँका काम करणार नाहीत. 4 आणि 5 तारखेला दुर्गापूजा/दसरा (महानवमी) आणि 5-6 ऑक्टोबरला दुर्गापूजा (दसई) निमित्त बँका बंद राहतील. याशिवाय 8 तारखेला हा दुसरा शनिवार आणि 9 तारखेला रविवार आहे. अशा परिस्थितीत येथील लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.