आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Barabanki Gang Rape Case Latest News And Updates: 15 Years Old Girl Killed After Gang Rape In Barabanki Uttar Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार:बाराबंकीमध्ये पीक कापायला गेलेल्या 15 वर्षीय मुलीवर पाच लोकांनी केला बलात्कार, नाक आणि तोंड दाबून ठेवल्याने जीव गुदमरुन मृत्यू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्टमॉर्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर एफआयआरमध्ये खुनासह बलात्काराची कलम वाढवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये पीक कापण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षीय मुलीसोबत पाच मुलींनी अत्याचार केले. दारु प्यायल्यानंतर आरोपींनी मुलीला शेतात नेले आणि गँगरेप केला. पीडितेचा आवाज येऊ नये यासाठी आरोपींनी तिचे तोंड आणि नाक दाबून ठेवले. यामुळे मुलीचा जीव गदमरला आणि तिचा मृत्यू झाला. याचा खुलासा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाला आहे. मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरही इजा झाल्याचे निशाण मिळाले आहेत.

सामूहिक बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी कलमा वाढवल्या आहेत. पोलिस हे कोठडीत असलेल्या पाच संशयितांचीही चौकशी करत आहेत, परंतु त्यांना अद्यापपर्यंत कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळालेले नाही. या घटनेनंतर गावात तणाव आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले.

बुधवारी सायंकाळी ही मुलगी शेतात गेली होती
सतरिख पोलिस स्टेशन क्षेत्राच्या गावात राहणारी पीडिता बुधवारी संध्याकाळी धान्य कापण्यासाठी शेतात गेली होती. जेव्हा ती बराच काळ परत आली नाही, तेव्हा कुटुंबीयांनी शोध सुरू केला. रात्री मुलीचा मृतदेह शेतात अर्धनग्न अवस्थेत आढळला. तिचे हात बांधले होते. घटनास्थळावरील परिस्थितीवरुन मुलीवर प्रथम बलात्कार करण्यात आला, नंतर तिचा खून करण्यात आल्याचे दिसत होते. गुन्हेगार एक किंवा दोन नसून त्यापेक्षा जास्त होते. त्या ठिकाणी दारुच्या तीन बाटल्याही सापडल्या आहेत.

एफआयआरमध्ये बलात्काराची कलम वाढली आहे

प्रभारी एसपी आरएस गौतम यांनी सांगितले की बुधवारी सायंकाळी सतरिख गावात शेतात मुलीचा मृतदेह आढळला होता. पोस्टमॉर्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर एफआयआरमध्ये खुनासह बलात्काराची कलम वाढवण्यात आली आहे. तपासासाठी अतिरिक्त एसपी यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले आहे. सर्व पुरावे गोळा केले जातील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser