आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Barabanki (UP) Road Accident Latest Updates। Trailer Collides With Bus 18 People Killed In Barabanki Uttar Pradesh; News And Live Updates

उत्तर प्रदेशात मोठा अपघात:डबल डेकर बसला ट्रकने दिली धडक, 1 महिलासह 19 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी आर्थिक मदतीची केली घोषणा

बाराबंकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बसमध्ये होते 150 पेक्षा अधिक प्रवासी

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे मंगळवारी रात्री उशीरा भीषण अपघात झाला आहे. लखनौ-अयोध्या महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डबल डेकर बसला वेगवान ट्रेलरने धडक दिली. दरम्यान, या घटनेत 1 महिलासह 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर 23 पेक्षा जास्त लोक जखमी आहे. गंभीर जखमी झालेल्या 10 जणांना ट्रामा सेंटर लखनऊ येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस हरियाणातून बिहारकडे जात होती. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बसमध्ये होते 150 पेक्षा अधिक प्रवासी
ही घटना बाराबंकीच्या रामसनेही घाट पोलिस स्टेशन परिसरात झाला आहे. यावेळी डबल डेकरमध्ये 150 प्रवासी होते. वास्तविक, रस्त्यात एक गाडी खराब झाल्याने गाडीतील सर्व प्रवाशी या गाडीमध्ये बसले होते. दरम्यान, रामस्नेहीघाट परिसरात दुर्घटनाग्रस्त गाडीचे एक्सल तुटले. त्यामुळे ड्रायव्हरने ही गाडी महामार्गावरील कल्याणी नदीच्या पुलावर पार्क केली होती.

घटनास्थळीवर पोलीस तपास करताना
घटनास्थळीवर पोलीस तपास करताना

प्रवासी खाली उतरले आणि बसच्या खाली त्याच्या समोर आणि आसपास बसले. दरम्यान, रात्री 11:30 वाजता लखनौ-अयोध्या महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डबल डेकर बसला वेगवान ट्रेलरने धडक दिली. दरम्यान, या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधानांनी आर्थिक मदतीची केली घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाराबंकी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून माहिती घेतली. पंतप्रधानांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. अपघातातील जखमींना 50-50 हजार दिले जाणार आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जखमींना मोफत उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसामुळे बचावकार्यात अडचणी
आरडाओरड ऐकल्यानंतर काही स्थानिक लोक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला दिली. दरम्यान, जखमी रुग्णांना लखनऊमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य वेगाने सुरु असून पावसामुळे यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या.

बातम्या आणखी आहेत...