आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Barwani Lockdown Accident Update; Four People Died, Two Children Injured In Road Accident In Barwani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:टँकर राँग साइडला जाऊन मोटारसायकलवर कोसळला; गाडीखाली दबून 4 जणांचा मृत्यू, तर 4 जण गंभीर जखमी

बडवानी/ सेंधवाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातात पती-पत्नीसह दोन मुलींचा मृत्यू, तर चालक-क्लिनर आणि दोन मुली जखमी

येथील एबी रोडवरील बिजासन घाटात रविवारी सकाळी 8.15 वाजता झालेल्या भिषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अलसी तेलाने भरलेले टँकर हायवेवर राँग साइडला जाऊन एका मोटारसायकलवर कोसळला. अपघातात मोटारसायकलवरील पती, पत्नी आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या. अपघातात टँकर चालक आणि क्लिनरदेखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थील दाखल होऊ, टँकरखाली दबलेल्या चालक, क्लिनर आणि दोन मुलींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तसेच, चार मृतदेहांना एक तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. 

एसडीओपो तरुणेंद्र सिंह बघेल यांनी सांगितले की, सकाळी 8.15 वाजता इंदुरकडून महाराष्ट्राकडे जात असलेल्या टँकर ( क्रमांक- आरजे-11-जीए-7727) अनियंत्रित होऊन मोटारसायकलवरुन जात असलेल्या चार मुली आणि पती-पत्नीवर आदळला. सूचना मिळताच घटनास्थळावर जाऊन पोलिसांनी दोन मुली आणि चालक क्लिनरला रुग्णालयात दाखल केले. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असू, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

अपघातात जखमी झालेली 6 महिन्यांची चिमुकली
अपघातात जखमी झालेली 6 महिन्यांची चिमुकली

तीन राज्यांत झालेल्या विविध अपघातांत 16 मजुरांचा मृत्यू

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या विविध अपघातांत 16 मजुरांचा मृत्यू झाला.

  • मध्यप्रदेशातील गुना येथे बस आणि कंटेनरच्या धडकते 8 मजुर ठार झाले. तर 54 जण जखमी झाले. अपघात रात्री 2 वाजता बायपास मार्गावर झाला. हे सर्व मजुर उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी होते.
  • उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात बुधवारी रात्री 11:45 वाजता रोडवेज बसने पायी जाणाऱ्या मजुरांना चिरडले. या अपघातात 6 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चार जखमी झाले.
  • बिहारमधील समस्तीपूरजवळ प्रवासी मजुरांची बस ट्रकवर आदळली. हा अपघात उशिरा रात्री झाला. यामध्ये दोन जण ठार तर 18 जण जखमी झाले. बस मुजफ्फरपूरहून कटिहारकडे जात होती. या बसमध्ये 32 मजुर होते.
बातम्या आणखी आहेत...