आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Basavaraj Bommai Will Be The New Chief Minister Of The State, Will Be Sworn In In A While; News And Live Updates

कर्नाटकमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी:बसरावराज बोम्मई बनले कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली शपथ, येडियुरप्पा यांनी ठेवला होता प्रस्ताव

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे

भाजप नेते बसवराज बोम्मई हे कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. बुधवारी राजभवनातील शपथविधी सोहळ्यात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे. सोमवारी झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत बसवराज बोम्मई यांचे नाव सर्वानुमते जाहीर करण्यात आले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

कोण आहेत बसवराज बोम्मई?
बसवराज बोम्मई राज्याचे सध्याचे गृहमंत्री असून त्यांचा जन्म 28 जानेवारी 1960 रोजी झाला होता. त्यांचे वडील एस आर बोम्माई राज्याचे मुख्यमंत्रीदेखील राहिले आहेत. मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी करत त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. बसवराज बोम्मई हे 1998 आणि 2004 मध्ये धारवाडमधून दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले आहे. त्यांनी 2008 मध्ये जनता दलला सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते यावर्षी हावेरी जिल्ह्यातील शिगगावमधून आमदार निवडून आले आहेत.

येडियुरप्पा यांनी स्वत: बोम्मईच्या नावाची घोषणा केली. ते बोम्मईचे राजकीय गुरू देखील आहेत.
येडियुरप्पा यांनी स्वत: बोम्मईच्या नावाची घोषणा केली. ते बोम्मईचे राजकीय गुरू देखील आहेत.

बसवराज पाटबंधारे प्रकरणात तज्ज्ञ
राज्याचे मुख्यमंत्री बसवराज हे अभियंता आणि शेतीशी निगडित असल्याने कर्नाटकातील सिंचन बाबींमध्ये तज्ज्ञ मानले जातात. बसवराज यांनी कर्नाटक राज्यात अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले आहेत. विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघात भारताचा पहिला 100% पाईप सिंचन प्रकल्प राबविण्याचे श्रेयही त्यांना जाते.

या नावाची सुरु होती चर्चा?
येडियुरप्पा यांनी सोमवारी आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण कोण मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चेला उधाण आले होते. गृहमंत्री बसवराज आणि खान मंत्री एमआर निराणी नवीन मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु आहे. कर्नाटकात विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. के. किशन रेड्डी यांना निरीक्षक केले आहे. त्यांच्या नेतृत्वात बेंगळुरूमध्ये ही बैठक होत असून यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे.

मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक जी किशन रेड्डी आणि धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक जी किशन रेड्डी आणि धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

येडियुरप्पा यांनी सोमवारी दिला राजीनामा
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे राज्यात आजच या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा करत आपण नेहमीच कठीण संकटातून गेलो असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजभवनात पोहोचल्यानंतर आपला राजीनामा राज्यपालांना सादर केला. राज्यपालांनीदेखील त्यांचा राजीनामा मान्य केला आहे. तथापि, नवीन मुख्यमंत्री जाहीर होईपर्यंत ते कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

लिंगायत समुदायावर मजबूत पकड
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा लिंगायत समुदायावर मजबूत पकड आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान या समाजाचे असणार आहे. गेल्या दिवशी लिंगायत समाजातील विविध मठातील 100 पेक्षा जास्त संतानी येडियुरप्पा यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला होता. त्यासोबतच त्यांना पदावर काढून टाकल्यास याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारादेखील या संतानी यावेळी दिला होता.

येदियुरप्पांच्या राजीनाम्याचे तीन कारणे?

  • येदियुरप्पांचे वय आणि बिघडलेली तब्येत.
  • कर्नाटकातील वर येत असलेले नेते आणि जुने संघी बी एल संतोष यांची येदियुरप्पांविषयी नाराजी.
  • येदियुरप्पांच्या कॅम्पमध्ये सक्रिय खासदार शोभा करंदलाजे यांचे मोदी कॅबिनेमध्ये सामिल होणे.
बातम्या आणखी आहेत...