आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Batla House Encounter Case |Batla House Encounter Case Latest News Update, Delhi Court Held Guilty And Convicted Ariz Khan, Indian Mujahideen Terrorist Ariz Khan, Indian Mujahideen (IM)

मोठी बातमी:अखेर बाटला हाउस एनकाउंटरवर कोर्टाचा निर्णय, इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने या प्रकरणाला अतिदुर्मिळ म्हटले

दिल्लीच्या साकेत कोर्टाने सोमवारी इंडियन मुजाहिदीन (IM) चा दहशतवादी आरिज खानला फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणाला अतिदुर्मिळ प्रकरण म्हटले आहे. आरिजला दिल्लीमध्ये 2008 मध्ये झालेल्या बाटला हाउस एनकाउंटरशी संबंधित एका प्रकरणात 8 मार्चला दोषी करार करण्यात आले होते.

एनकाउंटरदरम्यान आरिज पळून गेला होता. 2018 मध्ये त्याला नेपाळमधून अटक करण्यात आले होते. कोर्टाने त्याच्यावर कलम 302, 307 आणि आर्म्स अॅक्टमध्ये दोषी ठरवले. त्या एनकाउंटरमध्ये दिल्ली पोलिस इंस्पेक्टर मोहन चंद्र शर्मा शहीद झाले होते. आरिजला या प्रकरणात शिक्षा झाली आहे.

शिक्षेवर युक्तीवाद झाल्यानंतर निर्णय राखीव ठेवला होता

सोमवारी कोर्टात युक्तीवादादरम्यान आरिजकडून अॅडवोकेट एमएस खानने आपली बाजू मांडली. त्याने आरिजचे वय कमी असल्याचा हवाला देत शिक्षा कमी करण्याची विनंती केली. तर, सरकारी वकील एटी अंसारींनी मृत्युदंडाची मागणी केली.

काय आहे बाटला हाउस एनकाउंटर ?

दिल्लीतील बाटला हाउसमध्ये 19 सप्टेंबर 2008 च्या सकाळी एनकाउंटर झाला होता. या घटनेच्या एका आठवड्यापूर्वी 13 सप्टेंबर 2008 ला दिल्लीतील 5 ठिकाणी सीरियल बॉम्ब स्फोट झाला होता. 50 मिनीटात झालेल्या या पाच स्फोटात 39 जणांचा मृत्यू झाला होता.

दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते, तेव्हा ते बाटला हाउसमध्ये एल-18 नंबर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहचले होते. तिथे इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याकत आले होते. तर, दोघांना अटक आणि एक फरार झाला होता.

बातम्या आणखी आहेत...