आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Battle For India Will Be Fought And Decided In 2024 & Not In Any State Prashant Kishor

मोदींना टोला:​​​​​​​देशातील सत्तेची लढाई 2024 मध्येच लढली जाईल, राज्यांच्या निकालावरुन ते ठरवले जाऊ शकत नाही, साहेबांनाही हे माहिती आहे - प्रशांत किशोर

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी देशभरातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला पराभवाची जबरदस्त धूळ चारली आहे. दरम्यान, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे विधान समोर आले आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हा 2024 मधील स्थितीचे चित्र आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील निकालांवर बोलताना 2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजप यशाची पुनरावृती करेल असा दावा केला होता. मात्र आता यावरुन निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

प्रशांत किशोर ट्विट करत म्हणाले की, 'भारत देशातील सत्तेची लढाई 2024 मध्येच लढली जाईल. त्याच वेळी त्याचा निकाल लागेल. कोणत्याही राज्यांच्या निवडणुकांवरुन हे ठरवले जाऊ शकत नाही. साहेबांना (पंतप्रधान मोदी) देखील हे ठाऊक आहे. याच कारणामुळे त्यांनी राज्यातील निकालांवरुन असं (2024 च्या विजयाचं) वातावरण तयार करुन मानसिक दृष्ट्या विरोधकांविरोधात आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.' असा टोला प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षरित्या लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...