आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिन्ही सैन्यदलांत होणार अग्निवीरांची भरती:स्थायी सैनिकांसारखेच मिळणार पुरस्कार-पदके, पण पेंशन नाही; 90 दिवसांत पहिली भरती रॅली

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्कराच्या पायदळ, नौदल व हवाई दल या तिन्ही दलांत तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यासाठी एक नवी योजना लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तरुणांना केवळ 4 वर्षांसाठी संरक्षण दलांत सेवा द्यावी लागेल. सरकारने हे पाऊल वेतन व पेंशनवरील खर्च कमी करण्यासाठी उचलले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत आयोजित एका पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली. पहिली भरती रॅली 90 दिवसांच्या आत होईल.

लष्करी व्यवहार विभागाने तयार केलेल्या अग्निपथ भरती योजनेला पूर्वी 'टूर ऑफ ड्यूटी' असे नाव देण्यात आले होते. या योजनेंतर्गत अल्पमुदतीसाठी अधिक सैनिकांची भरती केली जाईल. याची अंमलबजावणी हा विभाग स्वत: करणार आहे. सरकारने आपला खर्च कपात करण्यासाठी व संरक्षण दलातील तरुणांची संख्या वाढवण्यासाठी ही महत्वकांक्षी योजना आणली आहे.

वार्षिक 45 हजार तरुणांची भरती

अग्निपथ योजनेंतर्गत वार्षिक सुमारे 45,000 तरुणांची सैन्यात भरती केली जाईल. हे युवक 17.5 ते 21 वयोगटातील असतील. त्यांना 4 वर्षे सैन्यात सेवेची संधी दिली जाईल. या 4 वर्षांत सैनिकांना 6 महिने मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल. तसेच 30 ते 40 हजार वेतन व इतर सवलती देण्यात येईल. विशेषतः तिन्ही सेवांतील कायमस्वरुपी सैनिकांप्रमाणे पुरस्कार, पदके आणि विमा संरक्षणही त्यांना मिळेल. अग्निवीरांना 44 लाख रुपयांचे विमा संरक्षण असेल.

25% अग्निवीरांना पुढील सेवेची संधी

4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर केवळ २५% अग्निवीरांचीच कायमस्वरूपी केडरमध्ये भरती केली जाईल. ज्या सैनिकांना 4 वर्षानंतरही सैन्यात सेवा करायची आहे, त्यांना गुणवत्ता आणि वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधारावर संधी मिळेल. कायमस्वरूपी केडरसाठी निवडल्या जाणाऱ्या सैनिकांना 15 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागेल. पहिली 4 वर्षे करारानुसार असतील. त्यामुळे त्याची पेन्शन मिळणार नाही.

या योजनेतून बाहेर होणाऱ्या 75% अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज दिले जाईल. 11-12 लाख रुपयांचे हे पॅकेज अग्निवीरांच्या मासिक योगदानातून अंशतः दिले जाईल. याशिवाय त्यांना स्किल सर्टिफिकेट आणि बँक लोनच्या माध्यमातून आणखी एक करिअर सुरू करण्यासाठी मदतही केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...