आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: इटारसी स्थानकावर पोलिसाची वृद्धाला क्रूर मारहाण:लाथा-बुक्क्या व बेल्टने मारले, प्लॅटफॉर्मवरून रुळावर उलटे लटकवले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशंगाबाद जिल्ह्याच्या इटारसी जंक्शनवर एका पोलिसाने वयोवृद्ध व्यक्तीला लाथा-बुक्क्यांनी निर्दयीपणे मारहाण केली. ही घटना बुधवारी घडली. रेल्वेत बसलेल्या एका प्रवाशाने याचा व्हिडिओ तयार केला. तसेच सोशल मीडियावरही टाकला. GRP च्या मते, या घटनेची रेल्वे स्थानकावरील व्हेंडर्सनी पुष्टी केली आहे. यापूर्वी हा व्हिडिओ जबलपूर स्थानकावरील असल्याचा दावा केला जात होता.

इटारसी रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4-5 वर एएच व्हीलरचे प्रत्यक्षदर्शी व्हेंडर अमित शर्मा यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास एका पोलिसाने वृद्ध व्यक्तीला मारहाण केली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांवर टीका करत पीडित व्यक्तीला न्याय देण्याची मागणी केली.

मदत मागितल्यानंतर मारहाण

व्हिडिओ फुटेजच्या आधारावर सदर वृद्ध व्यक्तीशी चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव गोपाल प्रसाद सांगितले. तो करेली, जिल्हा नरसिंहपूरचा रहिवाशी आहे. त्यांनी सांगितले -एक व्यक्ती मला शिविगाळ करत होता. त्याची तक्रार मी पोलिसाकडे केली. त्यानंतर त्यांनी मलाच मारहाण केली. मी त्या पोलिसाला ओळखतही नाही.

GRP च्या मते, प्राथमिक तपासात वृद्धाला मारहाण करणारा व्यक्ती आरपीएफ स्टाफचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाण करणाऱ्या स्टाफचा इनसाइन (मोनो) मध्य प्रदेश पोलिस दिसत आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी आता सीसीटीव्ही फुटेजचा धुंडाळा घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...