आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अत्याचार पीडित लाेक नक्षलींचा मार्ग चाेखाळतात, असे वृत्तपत्र, चित्रपटांतून नेहमी पाहायला मिळते. छत्तीसगडच्या बलरामपूर जिल्ह्यातील चलगली भागातील दहशतीचे दुसरे नाव बनलेल्या सीतारामची कहाणी वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याच्यामागील कारण शाेधण्यासाठी ‘भास्कर’ची टीम बादा गावी पाेहाेचली.सीतारामच्या वडिलांचे मूळ गाव काेटवार आहे. पाेलिस, अधिकाऱ्यांना गावात काही काम असले की ते मदतीसाठी पुढाकार घेत. असे वातावरण असतानाही विवाहित व पाेटी अपत्य असलेल्या सीतारामने हिंसेचा मार्ग निवडला. त्याची पाचवी प्रेमिका-पत्नी व सीतारामचा भाऊ श्रीरामने लहानपणी शालीन असलेल्या सीतारामचे नक्षलवादी बनणे आणि १५ वर्षांनंतर गावी परतण्याची कहाणी सांगितली...नक्षली मार्गावर चालणारा सीताराम एक-दाेन नव्हे पाचवेळा प्रेमात पडला. पहिलीने फसवले. दुसरीने सीतारामच्या विराेधात साथीदार नक्षलींना फूस लावली. तेव्हा सीतारामला लाेक पंचायतीसमाेर हजर व्हावे लागले. तेथे त्याने नक्षलींचा रुबाब बघितला. त्याचा सीतारामवर प्रभाव पडला आणि ताे नक्षलवादी झाला. दुसरी साेबतचे संबंध संपुष्टात येताच आणखी दाेन मुलींवर प्रेम जडले. त्यांनीही सीतारामला दगा दिला. प्रेमात त्याला अनेकदा अपयश आले. अपयशाला कंटाळून एकदा ताे फाशी घेण्याचा प्रयत्न करत हाेता. तेव्हा भावाने त्याला वाचवले हाेते. नंतर चाेरीच्या आराेपाखाली तुरुंगात गेला. जामिनावर परतला तेव्हा एका शाळकरी मुलीवर त्याचा जीव जडला. प्रेम रंगत असताना सीताराम नक्षली असल्याचे मुलीकडील लाेकांना समजले. सीताराममुळे दहशत वाढली आणि लाेकांना प्राण गमवावे लागतील किंवा कधी तरी सीताराम पाेलिसांच्या गाेळीचा शिकार हाेऊ शकताे, असे त्या मुलीला वाटले. माझी किंवा बंदुकीची निवड कर, असे त्या मुलीने सीतारामला सांगितले. तेव्हा सीतारामने बंदूक साथीदाराला देऊन टाकली. त्याच्याकडून दाेन हजार रुपये घेऊन गावी जाण्याचा बहाणा करून ताे आसामला गेला. तेथे दाेघांनी दाेन वर्षांनंतर विवाह केला आणि नाव बदलून राहू लागले. सीताराम भाजी विक्री करत असे. तेथेच घर घेतले. मात्र अचानक लाॅकडाऊन लागले आणि १५ वर्षांनंतर त्याला घराची आठवण आली. तेथे पाेस्टाने घरी फाेन क्रमांक पाठवला. त्या क्रमांकावर फाेन लावल्यावर ताे आसामीत बाेलत हाेते. आम्ही चुकीचा क्रमांक समजून बंद केला. त्यानंतर ताे माेडक्या-ताेडक्या हिंदीत स्वत:ची सीताराम अशी आेळख सांगत हाेता. त्याच्या म्हणण्यावर एक महिन्यानंतर विश्वास बसला. नंतर पाेलिस व सरकारला मी सीतारामबद्दल . त्याने शरणागती पत्करली.
शरणागती पत्करणाऱ्या नक्षलीच्या मुलाची विंग कमांडर हाेण्याची इच्छा
श्रीराम म्हणाले, सीताराम १५ वर्षांपासून बेपत्ता हाेता. आम्ही त्याच्यावर सांकेतिक स्वरूपात अंतिम संस्काराची तयारी करत हाेताे. आसामला असताना त्याची प्रेमिका पत्नीने २००६ मध्ये एका मुलास जन्म दिला. आता ताे आसाममध्ये ९ वीत शिकताे. सध्या ताे आईसाेबत पहिल्यांदा गावी आला आहे. ताे एनसीसी कॅडेट आहे. त्याला हवाई दलात विंग कमांडर व्हायचे आहे. वडील नक्षली कमांडर हाेते, हे त्या मुलाच्या मनातही नाही. सीतारामला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. तो आता २९ वर्षांचा आहे. त्याचा लवकरच विवाह होणार असल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.