आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ईशान्येतील काेराेना संसर्गाची स्थिती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत नियंत्रणात आहे, असे दिसून येते. त्यामागे शिस्त, प्रशासनाची सक्ती, परंपरेने मिळाली फिजिकल डिस्टन्सिंगची संस्कृती ही कारणे आहेत. ग्रामस्थ स्वत:हून विचारपूस करतात. घराघरातील संशयितांवर निगराणी ठेवली जात आहे. आसामला वगळल्यास सर्वच डोंगराळ राज्यांत ९९ टक्के रुग्ण बाहेरील आहेत. संपूर्ण क्षेत्रात केवळ गुवाहाटीमधील परिस्थिती भयावह आहे. येथे कोरोनाबाधित २ हजार ७४१ रुग्ण समोर आले आहेत. त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा काही स्रोत आढळून आलेला नाही. त्यास गट संसर्गाच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. कोरोना विषाणू संकटाला निपटण्यासाठी राज्य सरकारने २८ जूनपासून गुवाहाटीसह कामरूप महानगर जिल्ह्यात १४ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. येथील परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापर्यंत ८१ हजार ९७९ जणांची चाचणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री हेमंत सरमा म्हणाले, देशात कोरोना चाचणी करण्याच्या बाबतीत आसामचा क्रमांक चौथा लागतो. येथे १० लाख लोकसंख्येमागे १३ हजार ४७१ जणांची चाचणी करण्यात आली. गुवाहाटीला सोडल्यास राज्यातील वेगवेगळ्या भागात आतापर्यंत समोर आलेल्या रुग्णांत क्वाॅरंटाइनमधील लोकांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून आलेल्यांचा त्यात समावेश आहे. आसाममध्ये आतापर्यंत ११ हजार ७३६ रुग्ण आढळून आले आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला आहे. नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सीमेवरील राज्यांत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. एखाद्या कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी १४ दिवसांचे क्वाॅरंटाइन अनिवार्य आहे. नागालँडमध्ये रविवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५७८ झाली आहे. त्यात २२८ लोक बरे झाले आहेत. प्रदेशात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. नागालँडचे संसदीय कार्यमंत्री व सरकारचे प्रवक्ते निबा क्रोन म्हणाले, गाव आणि वस्त्यांवरील लोक अतिशय गांभीर्याने लाॅकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळे आम्हाला संसर्ग रोखण्यासाठी मदत मिळू लागली आहे. आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेशाला जोडणाऱ्या आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. या जागांवर पोलिसांची संख्या आता वाढली आहे. सुमारे ३७ लाख लोकसंख्येच्या मेघालयात ७० रुग्ण आहेत. ४३ लोक बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला. हा बरे होण्याचा दर ८९.१ टक्के आहे. आसामनंतर ईशान्येत सर्वाधिक रुग्ण त्रिपुरात आढळून आले. येथे १ हजार ५५८ रुग्ण आढळून आले असून १२०३ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मिझोराममध्ये कोरोना विषाणूचे एकूण १८६ रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी १३० रुग्ण बरे झाले आहेत. मणिपूरमध्ये आतापर्यंत कोविड-१९ चे १ हजार ३२५ रुग्ण आढळून आले आहेत. ६६ रुग्ण बरे झाले. अरुणाचल प्रदेशात कोविड-१९ चे एकूण २५२ रुग्ण नोंदवण्यात आले. त्यापैकी ७५ लोक ठणठणीत झाले.
गावाबाहेर क्वाॅरंटाइनसाठी बांबू आणि केळीच्या पानांपासून केंद्र
स्थानिक लाेकांनी बाहेरून आलेल्या लाेकांसाठी झाेपड्यांत केली. क्वाॅरंटाइनची व्यवस्था ग्रामीण भागात होम क्वाॅरंटाइनसाठी त्रिस्तरीय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे लोक क्वाॅरंटाइनमधील लोकांवर निगराणी ठेवतात. ते गावाबाहेर बांबू आणि केळीच्या पानांनी तयार केलेले असते. त्यांची भोजन-पाण्याची व्यवस्था केली जाते. मणिपूर, अरुणाचल प्रदेशात क्वाॅरंटाइन हट तयार केले आहे. या प्रदेशांत अशा प्रकारचा प्रयोग खूप यशस्वी ठरला. लक्षणे आढळून आलेल्यांना रुग्णालयांत पाठवण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.