आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If Gehlot Becomes The President Of Congress, He Will Have To Leave The Post Of Chief Minister, 'one Leader one Post' Will Be The Rule

काँग्रेसमध्ये ‘एक नेता-एक पद’ नियम राहणार:राहुल गांधींची घोषणा, गेहलोत अध्यक्ष झाल्यास मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार

कोची/जयपूर/ दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट अथवा सीपी जोशींची वर्णी

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी झाली. इकडे, भारत जोडो यात्रेदरम्यान एर्नाकुलम येथे राहुल गांधी यांनी उदयपूर चिंतन शिबिरातील ‘एक नेता-एक पद’ संकल्पाचे पालन केले जाईल, अशी घोषणा केली. प्रबळ दावेदार अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदासोबतच राजस्थानचे मुख्यमंत्रिपदही हवे आहे. त्यांच्यासाठी हा इशारा आहे. दरम्यान, गेहलोत अध्यक्ष झाल्यास राजस्थान मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट अथवा सी.पी.जोशी यांची वर्णी लागू शकते.

दिग्विजय, कमलनाथ, तिवारींचेही नाव चर्चेत
शक्यता..गुजरात निवडणुकीपर्यंत गेहलोत सीएम गेहलोत यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास काही वेळ दिला जाऊ शकतो. डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणूक असून त्याची जबाबदारी गेहलोत यांच्यावर आहे. त्यांचे पद काढून घेतल्यामुळे राजस्थानात राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाल्यास त्याचा थेट परिणाम गुजरातमध्ये होईल. गेहलोत यांनी या वर्षी अर्थसंकल्प लवकर मांडू, असे सांगून आपल्या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प असेल, असे संकेत दिले होते.

पायलट आज सोनियांना भेटणार
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, कमलनाथ आणि मनीष तिवारी हेसुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. दिग्विजय दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे सचिन पायलट शुक्रवारी दिल्लीत सोनिय गांधी यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधीसुद्धा यात्रा एक दिवस थांबवून दिल्लीत येणार आहेत. राहुल यांची दिल्लीवारी राजस्थानातील बदलाचे संकेत असल्याचे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...