आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Beer Boxes Looted By Knocking Container Driver Unconscious Goods Worth 43 Lakhs Stolen From Aurangabad

कंटेनर ड्रायव्हरला बेशुद्ध करत बिअरचे बॉक्स लुटले:औरंगाबादहून निघालेला 43 लाखांचा माल चोरीस

घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमधील वाळूज येथून २ हजार २०० बिअरचे बॉक्स मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या कंटेनर (एमएच ४३ बीजी ५४६३) चालकाला घोटीजवळ बेशुद्ध करून ४३ लाख २९ हजार ८५६ रुपयांच्या बिअरसह कंटेनर लुटारूंनी पळवला. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंटेनरचालक मोहंमद साजिद अबुलजैस शेख (२२, रा. आजमगड, उत्तर प्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीनुसार २९ ऑक्टोबरला वाळूज येथील कंपनीतून बिअरचे बॉक्स भरलेला कंटेनर घेऊन तो मुंबईकडे निघाला होता. ४० किमी अंतरावर तो जेवणासाठी हॉटेलवर थांबला. यादरम्यान चालक असल्याचे सांगत दोघे ठाण्याला जायचे आहे, असे सांगत कंटेनरमध्ये बसले.

घोटी पोलिसांत तक्रार लुटारू कंटेनर सिन्नरमार्गे घोटीकडे घेऊन गेले. यादरम्यान चालकाला बेशुद्ध करून दोन टप्प्यांत बिअरचे बॉक्स उतरवण्यात आले. शुद्धीवर आल्यावर चालकाला घडलेला प्रकार लक्षात आला. चालकाने घोटी पाेलिसांत याबाबत तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...