आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Before It Rained, Now It Rains Twice In Many Places; One Killed In Kashmir Cloudburst

अर्ध्या देशात मान्सूनचा विस्तार:आधी तरसवले, आता अनेक ठिकाणी दोनदा पाऊस; काश्मिरात ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसामच्या नागाव जिल्ह्यात रविवारी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन पोलिसांचे मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आले. आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरापर्यंत कामपूर पोलिस स्टेशनचे एक पथक बचाव कार्यात गुंतले होते, तेव्हा उपनिरीक्षक समुज्जल काकोटी आणि हवालदार राजीव बोरदोलोई पुराच्या पाण्यात वाहून गेले. राजीव बोरदोलोई यांचा मृतदेह सापडला. समुज्जल काकोटीचा मृतदेह सोमवारी सकाळी एसडीआरएफने बाहेर काढला.

रविवारपर्यंत मान्सूनने देशातील ५० टक्के भाग व्यापला आहे. विशेष म्हणजे मान्सूनचे आगमन झाल्यानंतर काही ठिकाणी दोनदा पाऊस पडला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हाच कल कायम राहिला तर देशभरात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडेल. हवामान तज्ज्ञांनुसार गेल्या काही वर्षांत मान्सूनच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल झाला आहे.

पूर्वी महिनाभरात जेवढा पाऊस पडत होता, तेवढाच आता आठवडाभरात पडत आहे. पूर्वी मोठ्या भागात संथ गतीने पाऊस पडत होता, आता मर्यादित भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हा हवामान बदलाचा परिणाम आहे. उदाहरणार्थ, तामिळनाडूमध्ये आतापर्यंत सामान्यपेक्षा 72% जास्त पाऊस झाला आहे, तर केरळमध्ये 57% कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे मेघालयात सरासरीच्या 3 पट, आसाममध्ये 2 पट जास्त पाऊस झाला आहे, तर शेजारच्या मणिपूर राज्यात 28% कमी पाऊस झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये ढगफुटीत ट्रक चालकाचा मृत्यू.
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये ढगफुटीत ट्रक चालकाचा मृत्यू.

जम्मू-काश्मीरात पुंछमधील मंडी भागात झालेल्या ढगफुटीत ट्रक चालकाचा मृत्यू झाला. मंडीच्या तहसीलदाराने सांगितले, ढगफुटीमुळे टेकडीवरून बराच मलबा वाहून गेला. हा ढिगारा रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकवर पडला, त्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून चालकाचा मृत्यू झाला.

मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस

रविवारी रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाने दमटपणापासून दिलासा दिला, तर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. हवामान खात्यानुसार मुंबईत ढगाळ वातावरण असेल आणि मुसळधार पाऊस पडेल.

ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील अनेक गावे पाण्याखाली

नागौन जिल्ह्यात पावसामुळे हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले.
नागौन जिल्ह्यात पावसामुळे हजारो हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले.

आसामच्या नागाव जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या काठावरील अनेक गावे पाण्याखाली गेली. अडीच लाख लोक पाणी साचल्याने बाधित झाले आहेत. या गावांमधील ५ हजार १७४ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. राज्य सरकारने बचाव कार्यासह 30 मदत छावण्या उघडल्या आहेत.

पावसाचा अंदाज वाढला

स्कायमेट या हवामान संस्थेचे शास्त्रज्ञ महेश पलावत यांनी सांगितले, मान्सून जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मध्य भारतात पोहोचतो. या महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू राहणार आहे. एप्रिलमध्ये आमचा अनुमान होता कि, जूनमध्ये ९८ टक्के पाऊस पडेल, पण आता तो ११० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...