आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Belagavi College Student Beaten Video । Maharashtra Karnataka Border Dispute Latest News । Karnataka Flag In College Festival

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विद्यार्थ्याला मारहाण:बेळगावात कॉलेज कार्यक्रमात विद्यार्थ्याने फडकावला कर्नाटकचा झेंडा, अख्ख्या वर्गाने झोडपले

बेळगावी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील बेळगावी येथे एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी एका विद्यार्थ्याने कर्नाटकचा झेंडा फडकावला. यामुळे त्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी मिळून बेदम मारहाण केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना गोगटे कॉलेजची आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे ही घटना घडली आहे.

विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीविरोधात कन्नड संघटनेने निदर्शने केली. याशिवाय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र समर्थक विद्यार्थ्यांना मारहाणही केली. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावीतील वातावरण चिघळवत असल्याचा आरोप कन्नड संघटनेने केला आहे. याच समजुतीमुळे झेंडा फडकावणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली.

मारहाण करणारे सर्व अल्पवयीन

बेळगावमध्ये विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी नाचताना दिसत आहेत. त्यापैकी एक कर्नाटकचा झेंडा फडकावत नाचत आहे. ध्वज पाहिल्यावर इतर विद्यार्थी मिळून त्याला मारहाण करू लागतात.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. या मारहाणीत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सीमावादावर होणार सुनावणी

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्राचा अर्ज योग्य नाही, असा युक्तिवाद आमच्या वकिलांनी केला आहे. आमची भूमिका घटनात्मक आणि कायदेशीर आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा.... नांदेडच्या 6 तालुक्यांना महाराष्ट्र नको! : तेलंगणात समावेशाची मागणी; सीमावर्ती भागातल्या प्रश्नांसाठी कृती समिती आक्रमक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा भडका उडाला असताना आता नांदेड जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांनी आम्हाला तेलंगणात जायचे आहे, अशी मागणी केलीय. त्यामुळे या भागातली खदखद समोर आलीय. माहूर, उमरी, देगलूर, बिलोली, किनवट, धर्माबाद या तालुक्यातील नागरिकांनी तेलंगणात जायची इच्छा व्यक्त केलीय. तसेच या प्रकरणी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. त्यासाठी "प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे" ही कृती समिती स्थापन करण्यात आलीय. संपूर्ण बातमी येथे वाचा

बातम्या आणखी आहेत...