आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाने घेतला केंद्रीय मंत्र्याचा बळी:बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी(65) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाने एका केंद्रीय मंत्र्याचा बळी घेतला आहे. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भुषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्वीटकरुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती देली होती.

नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख

गेल्या काही दिवसांपूर्वी सुरेश अंगडी यांना कोरोनाची बाधा झाली होती. संसदीय पावसाळी अधिवेशनासाठी सुरेश अंगडी दिल्लीलाही गेले होते. दरम्यान दिल्लीला त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कर्नाटक राज्याला आणि प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्याला जबर धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...