आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Belgaum Parliament Byelection, News And Updates, BJP Candidate Mangala Angadi, Congress Candidate Suresh Jarkiholi

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक:भाजपच्या मंगला अंगडी यांचा 5240 मतांनी विजय, अंगडी ठरल्या बेळगावच्या पहिल्या महिला खासदार

बेळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांच्याकडूनही टफ फाइट

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांनी 5240 मतांनी विजय मिळवला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघांत निवडून येणाऱ्या मंगला अंगडी पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत.

सप्टेंबर २०२० मध्ये बेळगावचे दिवंगत खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे बेळगावात पोटनिवडणूक घेण्यात आली. भाजपने अंगडी यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिली होती. बेळगांव लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवार श्रीमती मंगला अंगडी यांनी केवळ 5240 मतांनी विजय मिळविला आहे.

बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी, काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे रिंगणात होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, गोकाक, रामदुर्ग, अरभावी, सौदत्ती यल्लमा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता.

आज मतमोजणी च्या सुरुवातीला भाजपच्या अंगडी यांनी आघाडी घेतली होती पण नंतर काॅंग्रेसचे सतिश जारकीहोळी यांनी आघाडी घेतली. शेवटच्या तीन फेऱ्या बाकी असताना पुन्हा अंगडी यांनी मताधिक्य मिळाले. अंतिम फेरीपर्यंत मताधिक्यातील चढाओढीमुळे बेळगावच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अत्यंत अटीतटीने आणि चुरशीने झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने बेळगावचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा पराभव केला आहे.

मराठी अस्मितेचा गड राखला...

दरम्यान या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी तब्बल लाखांचा टप्पा ओलांडून घेतलेली मते घेऊन सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.

प्रमुख उमेदवाराना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

मंगला अंगडी : 440327

सतीश जारकीहोळी : 435087

शुभम शेळके : 117174

बातम्या आणखी आहेत...