आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Believe On Corona Vaccine : Side Effects Are Common In 5 10% Of People After Taking Any Vaccine; In Corona This Proportion Is Only 018%

भारताची लस सुरक्षितच:कोणतीही लस घेतल्यावर 5-10% लोकांमध्ये साइड इफेक्ट सामान्य बाब; कोरोनात हे प्रमाण केवळ 0.18%; विश्वास ठेवा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक आरोग्य कर्मचारी लस घेणे टाळताहेत, अशा खोट्या गोष्टींपेक्षा सकारात्मकता वाढवा : डॉक्टरांचे आवाहन

देशात ६ लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यातील ५८० लोकांत चक्कर, अशक्तपणा अशी सामान्य लक्षणे दिसली. हे प्रमाण ०.१८% आहे. आतापर्यंतच्या इतर लसींबाबत विचार केला तर त्यांचे साइड इफेक्ट झालेले प्रमाण ५ ते १० टक्के होते. हा आकडा सर्वात कमी आहे. या प्रतिकूल परिणामास अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन (एईएफआय) म्हणतात. म्हणूनच काहींनी लस घेतली नाही. दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य व कोविडवरील नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशनचे चेअरमन डॉ. व्ही. के. पॉल यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले की, लसीवर विश्वास ठेवा, ती घ्या. भारताची ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. अत्यंत कमी लोक ती घेेत आहेत हे अत्यंत दु:खद आहे.

इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी सूज, ताप, अंगदुखी, घबराट, अॅलर्जी किंवा चट्टे येऊ शकतात

> लसीच्या साइट इफेक्टची कारणे काय?

लस सुरक्षित राहावी म्हणून यात अनेक गोष्टी मिसळल्या जातात. उदा. अँटिजन म्हणून प्युरिफाइड किंवा इनअॅक्टिव्हेटेड टॉक्सिन, स्टोअरेजमध्ये सुरक्षित राहावी म्हणून मॅग्नेशियम क्लोराइड किंवा मॅग्नेशियम सल्फेट, अँटिजनची शक्ती वाढवण्यासाठी अॅल्युमिनियम सॉल्ट, अँटिबायोटिक म्हणून नियोमायसिन, प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून थियोमर्साल किंवा फॉर्मेल्डिहाइड इत्यादी. यामुळे किरकोळ रिअॅक्शन होऊ शकतात.

> सध्या जो त्रास आहे त्याचे कारण लस आहे?

सर्वच त्रास लसीमुळे होतो असे नाही. लसीकरण प्रक्रियेमुळेही होऊ शकतो. औषधामुळे अॅलर्जी होऊ शकते.

> लस दिल्यावर अडचणी कोणत्या येतात?

साधारणपणे तीन परिणाम होतात. किरकोळ, गंभीर किंवा अति गंभीर. बहुतांश वेळा किरकोळ त्रास होतो. यात इंजेक्शनची सूज, थोडा ताप, अंगदुखी, घबराट, अॅलर्जी आणि चट्टे येऊ शकतात.

> गंभीर त्रास कोणता होऊ शकतो?

खूप ताप येऊ शकतो. अॅनाफिलेक्सिस अॅलर्जी होऊ शकते. मात्र, यासाठी भरती होण्याची गरज पडत नाही. जिवाला धोका, दीर्घकाळ रुग्णालयात राहण्याची गरज, अपंगत्व किंवा मृत्यू हा अितगंभीर त्रास. मात्र, असे क्वचितच होत असते.

> प्रत्येक वेळी एकाच प्रकारचा त्रास होतो?

नाही. लस तयार करण्याची पद्धत कोणती, शरीराची प्रतिकारशक्ती कशी आहे यावरच ते अवलंबून असते. उदा. बीसीजी लसीमुळे चट्टे दिसतात. डीपीटीमुळे हलका ताप येतो. पोलिओ ड्रॉप दिले तर प्रतिकूल परिणाम दिसत नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम दिसू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...