आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील BJP आमदार स्वपन मजूमदार यांनी शनिवारी बनगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातील एक पोलिस ठाणे पेटवून देण्याची धमकी दिली. मजूमदार 24 परगणाच्या अशोकनगर येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवर भाजप कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्याचा आरोप केला.
पोलिसांना मारहाण व ठाणे जाळून टाकल्याची धमकी दिल्यानंतर मजूमदार यांच्याविरोधात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने अशोकनगर पोलिसि ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात अशा विधानांमुळे क्षेत्रातील कायदा-सुव्यवस्था भंग होण्याची भीती असते, असा दावा करण्यात आला आहे.
भाजप नेत्याच्या हत्येनंतर मजूमदार पोलिसांवर संतापले
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भुरकुंडा पंचायतीसमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप वैद्य यांची हत्या केली. या घटनेची तक्रार करूनही आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी नैहाटी रोडवरून निषेध रॅली काढली.
टीएमसी पोलिसांच्या मदतीने अशा घटना घडवून आणण्याचे धाडस करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी आपली वृत्ती न बदलल्यास पोलीस ठाणे जाळून टाकू, असे ते म्हणाले.
TMCला बेकायदा कृत्य करण्याची परवानगी
PTIच्या वृत्तानुसार, मजुमदार यांनी आरोप केला की, प्रभारी निरीक्षक व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांनी घटनेनंतर कोणालाही अटक केली नाही. एवढेच नाही तर पोलीस टीएमसीच्या लोकांना बेकायदा कामे करण्याची परवानगीही देत आहेत.
रॅलीत मजूमदार म्हणाले - अशोकनगर पोलिस स्टेशनच्या आयसी व ओसींनी लक्षात ठेवावे. आम्ही हे सहन करणार नाही. तुमचे वर्तन सुधारले नाही, तर एक दिवस आम्ही पोलिस ठाणे पेटवून देऊ. पोलीस स्टेशनचे IC/OC TMC चे एजंट म्हणून काम करताना दिसले, तर त्यांना मारहाण करा.
भाजपने अंग झटकले, म्हटले - त्यांच्या बोलण्यात लाचारी
मजूमदार यांच्या विधानानंतर भाजपचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले की, पक्ष मजूमदार यांच्या विधानाचे समर्थन करत नाही. तथापि, भाजप समर्थकांवर हल्ले होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे ते असहाय्यतेपोटी असे म्हणाले. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना दमदाटीही केली. मात्र खऱ्या गुन्हेगारांवर अद्याप कारवाई झाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.