आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा सादर केला. भाजपने याला 'सोनार बांग्ला' म्हटले आहे. भाजपने सादर केलेल्या जाहीरनाम्यात सरकारी नोकरीमध्ये महिलांना 33% आरक्षण, मासेमारी करणाऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये, केजी ते पीजीपर्यंतर मुलींना मोफत शिक्षण आणि उत्तर बंगाल, जंगलमहल आणि सुंदरबनमध्ये 3 नवीन एम्स सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, प्रत्येक कुटुंबातील कमीत-कमी एका व्यक्तीला रोजगार देणार असल्याचेही म्हटले आहे. तसेच, नोबल प्राइजच्या धर्तीवर टागोर बक्षीसही देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
कोलकाताच्या ईस्टर्न जोनल कल्चरल सेंटर (EZCC)मध्ये जाहीरनामा सादर करताना अमित शहा म्हणाले की, 'देशभर प्रत्येक धर्माचा सण साजरा केला जावा. सरस्वती आणि दुर्गा पुजेसाठी कोर्टाची परवानगी घेण्याची गरज नाही. 70 वर्षांपासून जे शरणार्थी येथे राहत आहेत, पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यांना नागरिकत्व कायदा (CAA) लागू करुन त्यांना देशाचे नागरिकत्व दिले जाईल. मुख्यमंत्री शरणार्थी योजनेतून प्रत्येक शरणार्थी कुटुंबाला 5 वर्षापर्यंत DBT तून 10,000 रुपये वार्षिक दिले जातील. याशिवाय, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून बंगालच्या 75 लाख शेतकऱ्यांना 3 वर्षापासून 18 हजार रुपये मिळाले नाहीत, ते त्यांच्या खात्यात दिले जातील. यानंतर केंद्राच्या 6 हजार रुपयांसोबत राज्य सरकारकडून 4 हजार, म्हणजेच 10 हजार रुपये दिले जातील.
भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे...
बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान
पश्चिम बंगालमधील 294 जागेसाठी 8 टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. यात 27 मार्च (30 जागा), 1 एप्रिल (30 जागा), 6 एप्रिल (31 जागा), 10 एप्रिल (44 जागा), 17 एप्रिल (45 जागा), 22 एप्रिल (43 जागा), 26 एप्रिल (36 जागा) २ एप्रिलला (35 जागा) मतदान होणार आहे.
आसामसाठी जेपी नड्डा जाहिर करणार जाहीरनामा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे 23 मार्चला आपला जाहीरनामा जाहिर करतील. विधानसभेच्या 126 जागेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे . पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही 23 मार्चला होईल तर निकाल 2 एप्रिलला येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.