आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालच्या 5 जिल्ह्यांच्या 44 जागांवर आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये हिंसा उसळल्याचे वृत्त आहे. कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे समर्थकांमध्ये हिंसा उसळली. या हिंसेमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे तर चार लोक हे गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. CRPF च्या फायरींमध्ये या लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात आहे. तर कूचबिहारमध्ये बूथ क्रमांक 285 वर मतदान केंद्राबाहेर बॉम्ब फेकण्यात आले आणि गोळीबार झाला. यामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणांचा मृत्यू झाला आहे.
यानंतर निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेत विशेष निरीक्षकांच्या अंतरिम अहवालाच्या आधारे कूचबिहारच्या सिताकुलची विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 126 मधील मतदान स्थगित करण्याचे आदेश दिले. त्यांच्या व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सविस्तर अहवाल आयोगाने मागवला आहे.
ममता बॅनर्जींचा आरोप - गृहमंत्र्याच्या निर्देशावर कट रचला
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, CRPF ने सीतालकुचीमध्ये चार लोकांची गोळी मारुन हत्या केली. सकाळी अजून एक मृत्यू झाला होता. CRPF माझे शत्रू नाही, मात्र गृहमंत्र्यांच्या निर्देशावर एक कट रचला आहे आणि आज सकाळची घटना त्याचाच पुरावा आहे. ममता रविवारी कूचबिहारमध्ये फायरिंग झालेल्या ठिकाणाचा दौरा करतील.
हुगलीमध्ये भाजप नेत्याच्या कारवर हल्ला
हुगलीमध्ये भाजप नेते लॉकेट चटर्जी यांच्या कारवर स्थानिक लोकांनी हल्ला केला. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर सुरक्षादलाने अनेक प्रयत्नांनंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढले. यानंतर त्यांनी निवडणूक आयोगासोबत चर्चा केली. ते म्हणाले की, माझी गाडी तोडण्यात आली, मला मारण्याचा प्रयत्न झाला. मी याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. पोलिसांनी काहीच केले नाही. ही घटना बूथ क्रमांक -66 वर घडली. मी निवडणूक आयोगाकडे येथे अतिरिक्त फौज डिप्लॉय करण्याची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.