आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालचा पोल ऑफ पोल्स:बंगाल : एक्झिट पोल संभ्रमात; दीदी 2 तर 1 मध्ये मोदी, एकात दोन्ही पुढे

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक्झिट पोल 50-50, प. बंगालचा निकाल २ मे रोजीच लागणार

पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठव्या टप्प्यातील मतदानासोबतच ५ राज्यांच्या निवडणुकांची सांगता झाली. निकालांसाठी २ मेची वाट पाहावी लागेल. कारण, गुरुवारी मतदानानंतर समाेर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्येही निकालांवर एकमत नाही. ४ माेठ्या संस्थांच्या पोलपैकी २ पोल ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला, तर एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमताचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने तर दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा देत दोघांनाही बहुमत दर्शवले आहे. म्हणजे बंगालच्या मतदारांनी यंदा एक्झिट पोल संस्थांकडेही आपली ‘मन की बात’ सांगितलेली नसल्याचे दिसते. खरा निकाल २ मे रोजीच लागणार आहे. भाजप व तृणमूलने एक्झिट पोल्स आपल्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे.

भाजपला बंगालमध्ये जागांचा फायदा, आसाममध्ये नुकसान
भाजपला बंगालमध्ये सत्ता न मिळूनही फायदा दिसतो. आसाममध्ये सत्ता मिळाली तरी नुकसान होईल. बंगालमध्ये २०१६ मध्ये भाजपने फक्त ३ जागा जिंकल्या होत्या, आता एक्झिट पोल १२०-१३० जागा देत आहेत. म्हणजे दीदींच्या किल्ल्याला खिंडार पडले आहे. आसाममध्ये सत्ता असूनही २ जागांचे नुकसान दिसत आहे. बंगालमध्ये एवढ्या जागा मिळाल्या तर त्या बळावर राज्यसभेत बहुमताची अपेक्षा आहे.

तामिळनाडूत द्रमुक पुढे, प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व
तामिळनाडूत प्रत्येक संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये सत्तारूढ अद्रमुकच्या तुलनेत द्रमुकला अनेक पट जागा मिळत असल्याचे दिसते. अद्रमुक अंतर्गत भांडणामुळे त्रस्त होता, तर करुणानिधींशिवाय पहिलीच निवडणूक लढत असलेला द्रमुक स्टॅलिनच्या नेतृत्वात एकजूट दिसत आहे. राज्यात प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व कायम आहे. भाजपची अद्रमुकशी तर काँग्रेसची द्रमुकशी युती आहे.

पुद्दुचेरी: एनडीएला मिळणार आघाडी
पुद्दुचेरीच्या ३० जागांसाठी एक्झिट पोलमध्ये सीएनएक्सने एनडीएला १६-२० जागा, तर काँग्रेस+ ला ११-२० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बहुमतासाठी १६ जागांची गरज आहे.

केरळ
केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफला पुन्हा सत्ता मिळेल असे दिसते. दोन पोलमध्ये एलडीएफला १०० पेक्षा जास्त जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला २० ते ५० जागांचा अंदाज वर्तवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...