आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमध्ये श्वसननलिकेत झालेल्या संसर्गामुळे 24 तासांत 7 मुलांचा मृत्यू झाला आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, यातील 5 बालकांचा मृत्यू कोलकात्याच्या सरकारी इस्पितळात झाला आहे. तर उर्वरित दोघांचा मृत्यू बांकुरा सम्मिलानी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात झाला.
सरकारच्या मते, सर्वच मुलांचा मृत्यू एक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शनमुळे (ARI) झाला आहे. सध्याचे वातावरण पाहता ही सामान्य गोष्ट आहे. यासंबंधीच्या आकडेवारीनुसार, मागील एका महिन्यात राज्यात ARI चे 5,213 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यामुळे हा संसर्गजन्य आजार समजला जाऊ नये. प्रशासनानेही या स्थितीचा निपटारा करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी 121 रुग्णालयांत 5000 बेड व 600 बाल रोग तज्ज्ञ तैनात करण्यात आलेत.
सरकारने काही दिवसांपूर्वीच एका निवेदनाद्वारे, राज्यात एडीनो व्हायरसमुळे आतापर्यंत 12 मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते. यापैकी 8 जणांना अन्य गंभीर आजार होते. त्यानंतरही सरकारने मागील 24 तासांत झालेले मृत्यू एडीनो व्हायरसमुळे नव्हे तर ARI मुळे झाल्याचा दावा केला आहे.
ममताी सरकारने जारी केला आपत्कालीन क्रमांक
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी या प्रकरणी एक आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्यामुळे सरकारने या प्रकरणी दिशानिर्देश व 24x7 आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.