आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील हजारो युवकांनी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत एसएससी (स्कूल सर्व्हिस कमिशन) परीक्षा दिली होती. आपले आयुष्य सावरेल, असे त्यांना वाटले होते, पण घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेकडो उमेदवार ५१० दिवसांपासून नोकरीसाठी धरणे आंदोलन करत आहेत. राज्य सरकार त्यांना आश्वासन तर देत आहे, पण हे तरुण नियुक्तिपत्रासाठी अडून बसले असून कोलकात्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत आहेत. अलीकडेच माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनीही त्यांची भेट घेतली होती.
एसएससीची परीक्षा २०१६ मध्ये झाली होती. निकाल २०१७ मध्ये आला तेव्हा सिलिगुडीच्या बबिता सरकार यांना ७७ गुण मिळाले होते. दरम्यान, गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली. नव्या गुणवत्ता यादीत बबिता यांचे नाव प्रतीक्षा यादीत गेले. दुसरीकडे, राज्याचे मंत्री परेश अधिकारी यांची मुलगी अंकिताचे नाव मेरिटमध्ये पहिल्या क्रमांकावर आले. विशेष म्हणजे अंकिताला बबिता यांच्यापेक्षा कमी गुण होते. बबिता यांच्या पतीने त्याला आव्हान दिल्यावर घोटाळा समोर आला. न्यायालयाने अंकिताला नोकरीवरून हटवले आणि सर्व वेतनही परत करण्याचे निर्देश दिले.
१००० अपात्र लोकांना गुण वाढवून दिली नोकरी
चौकशीत असे आढळले की, आयटीआयद्वारे काही उमेदवारांचे गुण वाढवण्यात आले आणि सुमारे १००० अपात्र लोकांना नोकरी देण्यात आली. त्यात २५० लोक तर असे होते, ज्यांची नावे गुणवत्ता यादीत नव्हती. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.