आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bengal's Vrindavan Dham Requires Vegetarians To Visit, Strict Rules For Devotees At 350 year old Temple

परंपरा:बंगालच्या वृंदावन धाममध्ये दर्शन घेण्यासाठी शाकाहारी असणे गरजेचे ,  350  वर्षे जुन्या मंदिरात भक्तांसाठी कडक नियम

बबीता माली } बावली (प. बंगाल)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाताहून सुमारे ३५ किमी दूर बजबजजवळ बावली हे गाव आहे. येथील ३५० वर्षे जुन्या मंदिरात भक्तांसाठी अत्यंत कडक नियम आहेत. येथे दर्शन घेण्यासाठी शाकाहारी असणे गरजेचे आहे. याशिवाय मंदिरात प्रवेश केला तरीही मूर्तींना स्पर्श करण्यास मनाई आहे. या मंदिराला गुप्त वृंदावन धाम नावाने ओळखले जाते. पाच एकरातील या धाममध्ये ५ मंदिरे आहेत. त्यांचा जीर्णोद्धार केला जात आहे. असे म्हटले जाते की, या मंदिरांचे बांधकाम बावलीच्या मंडळ जमीनदारांनी केले असले तरी त्यांचे मूळ यूपीमध्ये आहे. मंदिराचे बांधकाम, नामकरण आणि नियमांबाबत समिती सदस्य दिवाकर कोले यांनी रंजक माहिती दिली. कोले म्हणतात, ‘मायापूर इस्कॉन टेम्पल आणि गौडीय मठाप्रमाणेच या मंदिराचे नियमही कडक आहेत. पुरुषांना पूजा करायची असेल तर त्यांच्यासाठी वैष्णव धर्मामुसार कपाळावर टिळा, गळ्यात तीन वळणे असलेली तुळशीची माळ असणे गरजेचे आहे. महिलांसाठी कपाळावर टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ पुरेशी आहे.’ चैतन्य महाप्रभूंच्या आगमनानंतर कायापलट : कोले सांगतात, ‘बावलीतील मंडळ जमीनदार शिवभक्त होते. मात्र, अनेक शतकांपूर्वी चैतन्य महाप्रभू येथे आले होते. वस्तुत: नदियाचे जमीनदार गौर मोहन दास यांच्यासोबत चैतन्य महाप्रभू पायी भ्रमंती करत होते. ते बावलीला आले तेव्हा त्यांनी मंडळ जमीनदारांच्या मनात वैष्णव धर्माबद्दल श्रद्धा जागृत केली. यामुळे ते वैष्णव धर्माचे उपासक झाले. या जमीनदारांनी श्रीकृष्णाच्या १०८ नावाने मंदिर बनवण्याची शपथ घेतली होती. त्यानुसारच बावलीमध्ये १७ मंदिरे बांधण्यात आली. कोले म्हणतात, ‘येथील पाच मंदिरे वगळता राधावल्लभ, राधागोपीनाथ, राधागोविंद, गोपालजी, जगन्नाथ व बलराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.