आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरूध्ये एका एअरहोस्टेसचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार-शनिवारी रात्रीची आहे. अर्चना धीमान असे या एअरहोस्टेसचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, एअरहोस्टेस तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी दुबईहून बंगळुरूला आली होती. पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण...
अर्चनाचे तिच्या प्रियकरासोबत वारंवार भांडणे व्हायचे : पोलिसांनी सांगितले की, अर्चना कोरोमंगला भागातील एका फ्लॅटमध्ये प्रियकर आदेशसोबत राहत होती. एका कंपनीत काम करत असताना दोघांची भेट झाली. तेव्हापासून दोघेही एकत्र राहत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती.
प्रियकराचा दावा - अर्चनाचा पाय घसरल्याने मृत्यू झाला : चौकशीदरम्यान आदेशने पोलिसांना सांगितले की, घटनेपूर्वी दोघांनी एकत्र बसून दारू प्राशन केली होती. यानंतर अर्चनाचा पाय घसरला आणि ती बाल्कनीतून खाली पडली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस सध्या अर्चनाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.
पोलिसांनी सांगितले - दोघांमध्ये मारहाण झाली : याप्रकरणी डीसीपी सीके बाबू यांनी सांगितले की, रात्री उशिरा दोघांमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर एअरहोस्टेसने अपार्टमेंटमधून उडी मारली. ते म्हणाले की, आम्ही अपार्टमेंट आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.