आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरूमधील बैयप्पनहल्ली रेल्वे स्थानकावर ड्रममध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, तीन जणांनी रिक्षात ड्रम आणून स्टेशनवर टाकला. सीसीटीव्ही फुटेजवरून हे उघड झाले आहे. आता फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये तीन महिन्यांतील ही तिसरी घटना असल्याचे सांगण्यात आले. मृत महिलेचे वय अंदाजे 32 वर्षे आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस, बंगळुरूमध्ये अशाच आणखी दोन घटना उघडकीस आल्या...
पहिली केस : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पहिली केस SMVT रेल्वे स्थानकावर उघडकीस आली होती. येथे एका अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वेगाडीत पिवळ्या गोणीत आढळून आला होता. सामानाजवळ ठेवलेल्या पोत्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार एका प्रवाशाने केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
दुसरी केस : 4 जानेवारीची आहे. रेल्वे पोलिसांना यशवंतपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर निळ्या रंगाच्या ड्रममध्ये एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी मृतदेह आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथून आणल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो रेल्वे स्थानकावर टाकण्यात आला.
पोलिसांनी सांगितले - या तिन्ही प्रकरणांमध्ये कोणताही संबंध नाही
पोलीस सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत. बंगळुरूच्या रेल्वे स्थानकांवर तीन महिन्यांत तीन महिलांचे मृतदेह सापडले आहेत, ही देखील विचार करायला लावणारी गोष्ट आहे. सर्व घटना वेगळ्या असल्याचं पोलिस सांगत आहेत. या घटनांमध्ये कोणताही संबंध असल्याचा पुरावा नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.