आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bengaluru Rain Flood Updates । Water Lodging In Many Roads Video । Rescue Boats On Roads

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने पूरसदृश परिस्थिती:अनेक भागांत वाहतूक ठप्प, रस्त्यावर उतरल्या बोटी

बंगळुरू24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरूमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील अनेक भागांत इतके पाणी तुंबले आहे की, लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोटींची मदत घेतली जात आहे. येथील वरथूर उपनगरात बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांमध्ये बेलंदूर, सर्जापुरा रोड, व्हाईटफील्ड, आऊटर रिंग रोड आणि बीईएमएल लेआउट यांचा समावेश आहे. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी शहरात जोरदार पाऊस झाला होता. तेव्हाही परिस्थिती अशीच होती.

पॉश भागातही पहिल्यांदाच पाणी तुंबले

मराठाहळ्ळीतील स्पाइस गार्डन परिसरात दुचाकी पाण्यात तरंगताना दिसल्या. स्पाइस गार्डन ते व्हाईटफिल्डपर्यंत पाणी साचल्याने रस्ता बंद करावा लागला. यंदा प्रथमच अनेक पॉश भागांत पाणी तुंबले आहे. येथील अनेक रहिवाशांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

बंगळुरूच्या बेलंदूरमधील आऊटर रिंग रोडवर पाणी तुंबले.
बंगळुरूच्या बेलंदूरमधील आऊटर रिंग रोडवर पाणी तुंबले.

वर्गात पाणी तुंबले; पुस्तके, दप्तरे पाण्याखाली

शहरातील अनेक भागांत शाळांमध्ये पाणी शिरले होते. मुलांची दप्तरे आणि पुस्तके पाण्यात तरंगताना दिसली. येथे मुले वर्गातून पाणी काढण्याचा प्रयत्न करताना दिसली. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुस्तके व इतर साहित्य पाण्यातून बाहेर काढले.

अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने मुलांचे सामान भिजले.
अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने मुलांचे सामान भिजले.

विमानतळावरही साचले पाणी, मुख्यमंत्र्यांवर लोक संतापले

मुसळधार पावसाचा परिणाम बंगळुरू विमानतळावरही दिसून आला. विमानतळाच्या मुख्य गेटवरही पाणी साचले होते. व्हाईटफिल्ड मेन रोडवर बीएमसीची बस पाण्यात अडकली, तिला लोकांनी दोरीने ओढले. अनेकांनी ट्विट करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लक्ष्य केले. लोक म्हणाले की, आता बंगळुरू हे युरोपीय स्तराचे शहर झाले आहे. इथले भाग व्हेनिससारखे दिसू लागले आहेत. एवढा महसूल गोळा करूनही बंगळुरूची पायाभूत सुविधा देशातील सर्वात वाईट पायाभूत सुविधांपैकी एक असल्याचे एका युझरने म्हटले आहे.

बंगळुरू विमानतळाच्या प्रवेशद्वारावर पाणी तुंबले.
बंगळुरू विमानतळाच्या प्रवेशद्वारावर पाणी तुंबले.
मुसळधार पावसामुळे अनेक दुचाकी पाण्यात बुडाल्या. अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात जाम झाले होते.
मुसळधार पावसामुळे अनेक दुचाकी पाण्यात बुडाल्या. अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात जाम झाले होते.

9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता

कर्नाटकात 9 सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरूच राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगळुरू, किनारी कर्नाटकातील 3 जिल्हे आणि डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान कोडागु, शिवमोग्गा, उत्तरा कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी आणि चिकमंगलूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...