आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील बंगळुरुमधील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 10 रुपायंच्या रुपयांच्या नोटा रस्त्यावर उडताना दिसत आहेत. खाली गोळा झालेली लोकांची या नोटा गोळा करण्यासाठी झुंबड उडाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून 10 रुपयांच्या अनेक नोटा फेकल्या. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, गळ्यात घड्याळ घातलेला एक व्यक्ती उड्डाणपुलावर उभे राहून 10 रुपयाच्या नोटा पुलावरुन खाली फेकत आहेत. नोटा पकडण्यासाठी उड्डाणपुलाखाली लोकांची गर्दी झाली होती. एवढेच नाही तर उड्डाणपुलावर उभे राहून वाहने थांबवूनही लोक त्या व्यक्तीकडे जाऊन पैसे मागू लागले. त्यामुळे रस्त्यावर जाम झाला आणि एकच गोंधळ उडाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, 30 वर्षीय व्यक्तीने एकूण 3000 रुपये फेकले. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा संशय आहे.
बनावट नोटांच्या सिंडिकेटचा सर्वात मोठा खुलासा
कोरोनाचा लाटा थंडावल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवर पुन्हा एकदा बनावट नोटांचा धंदा धडाक्यात सुरू झाला आहे. या गोरखधंद्यात दुबई, मलेशिया, बांगलादेश व पाकिस्तानचे तस्कर आहेत. मोठा अड्डा नेपाळच्या परसा व बारा जिल्ह्यात आहे. म्होरक्या दुबईत आहे. जवळपास 80 कोटी बनावट नोटांची खेप नेपाळमध्ये पोहोचली आहे. दीपावली-छटनंतर होळीपर्यंत बाजारपेठेत रोकड वाढेल. त्या तुलनेत या बनावट नोटाही लोकांच्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला जाईल. येथे वाचा संपुर्ण बातमी.
नोट फाटली, रंग लागला तर चिंतेत पडू नका
आपल्या खिशात असलेल्या नोटांवरून आपल्या मनात अनेक विचार कायम येत असतात. खास करून कोणाकडूनही नोट घेताना आपण नोट फाटकी तर नाही ना, त्यावर काही लिहलेले नाही ना, याची पूर्ण खात्री करून स्विकारतो. तर आपल्याकडे असलेली अशी फाटकी नोट देखील अनेक दुकानदार घेत नाहीत. चांगली नोट द्या, अशी मागणी दुकानदार देखील आपल्याकडे करतो. अर्थात यात काहीच चूकीचे नाही. मग फाटलेल्या नोटांचे करायचे काय, याबाबत आरबीआयने काय नियम सांगितले आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.