आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘शहरात तर इतके सारे तारे एकत्र बघणे अशक्य आहे. कारण प्रदूषणामुळे आकाशही स्वच्छ दिसत नाही. येथील वातावरण आणि आकाश एकदम स्वच्छ होते. आमच्यावर कोणी चंद्र आणि ताऱ्यांची चादर पांघरवली, असे वाटत होते. येथे आल्यावर वाटले की मी पुनर्जीवित झाले आहे.’ हे म्हणणे आहे उत्तराखंडच्या बेनितालमध्ये झालेल्या पहिल्या ॲस्ट्रो पार्टीत सहभागी होण्यासाठी आलेल्या श्रेया सोनालीचे. सोनाली म्हणाली, ‘पार्ट्या तर अनेक केल्या. पण ही अगदीच वेगळीच ठरली. आम्ही दोन दिवस येथे थांबलो. असे वाटत होते की आता वेळ थांबून जावी. फक्त एकटक आम्ही चंद्र आणि लुकलुकणारे तारे बघत राहावे.’ देशात पहिल्यांदाच ॲस्ट्रो पार्टी म्हणजे चंद्र-ताऱ्यांमधील पार्टीत सुमारे ८२०० फूट उंचीवरून सहभागींनी चंद्र-तारे जवळून बघितले असता असे वाटले की ते जणू दुसऱ्याच विश्वात पोहोचले.
सोनाली म्हणाली, ‘अशी आयोजने महत्त्वाची आहेत. कारण यामुळे आकाशीय घटनांविषयी भरपूर माहिती मिळते. दिल्लीहून आलेल्या रमेश मुमक्षूंनी सांगितले, ‘शहरातून या गोष्टी हरवल्या आहेत. येथे आल्यानंतर वाटले की, पुनरुज्जीवन झाले आहे. दोन रात्री चंद्र-ताऱ्यांची माहिती घेतल्यानंतर दिवसा आम्ही जवळच्या गावातील शाळेतही गेलो. दृश्य अप्रतिम होते. तेथे रॉकेट बनवण्यापासून ते लाँचिंगपर्यंतच्या सर्व प्रक्रिया जाणून घेतल्या. टेलिस्कोपमधून गुरू ग्रह पाहणे अविस्मरणीय अनुभव होता. अशी दृश्ये आजवर टीव्हीवरच पाहत होतो. परंतु ते लाइव्ह पाहिल्यानंतर स्तब्ध झालो. उत्तराखंड सरकार, चमोली प्रशासन आणि स्टारस्केप्सने हे आयोजन केले होते. संस्थेच्या रामाशिष रे यांनी सांगितले की, हा देशातील पहिला ॲस्ट्रो पार्क आहे. ॲस्ट्रो टुरिझमला चालना देण्यासाठी हा प्रयत्न केला गेला.
पर्यटकांच्या मदतीसाठी रात्रभर ८ तज्ज्ञ साइटवरच हजर राहिले. प्रवेशासाठी शुल्क नव्हते. आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये ॲस्ट्रो पार्टी आयोजित करू. सहभागींनी सांगितले की, बेनितालसारख्या सुंदर, अप्रतिम ठिकाणी रात्री आकाशाच्या जादूचा अनुभव खूपच रोमांचक होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.