आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

90 वर्षांच्या बलात्कार पीडित आजीची आपबिती:झुकलेली कंबर, सुजलेला चेहरा, जखमांच्या निळ्या खुणा, कोरडे ओठ, थरथरणारे हात, जखमा लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असलेल्या सुरकूत्या

नवी दिल्ली (पूनम कौशल)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेव्हा त्या आजी आपल्यासोबत झालेल्या दुष्कर्माविषयी सांगत होत्या, तेव्हा त्यांची कोपऱ्यात उभ्या 15 वर्षांच्या नातीच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती
  • शेजारी महिला म्हणते - 'जर एखादी तरुण मुलगी असती किंवा आमच्यासारखी एखादी महिला असती तर लोक म्हणाले असते की, काय करायला गेली होती, पण या 90 वर्षांच्या म्हातारीवर काय आरोप लावणार?'

दक्षिण दिल्लीच्या बाहेरच्या परिसरातील या गावात एक विचित्र उदासिनता आहे. महिलांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसून येतेय. जुन्या घरात बसलेल्या स्त्रिया, खेड्यातल्या सर्वात जुन्या महिलेच्या आजुबाजूने बसून त्यांचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मी जशी पुढे जाते ती वयस्कर महिला मला मिठी मारते. थरथरणारे हात डोक्यावर फिरवून आशीर्वाद देते..

झुकलेली कंबर, सुजलेला चेहरा, जखमांच्या निळ्या खुणा, कोरडे ओठ, थरथरणारे हात, जखमा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरकुत्या आणि कोरडे डोळे. त्या वयस्कर महिलेचे अश्रू माझ्या डोळ्यात उतरले.

कसं तरी आपलं विव्हळणं बाजूला सारत त्या म्हणतात, 'त्या नराधमाला फाशी दिलीच पाहिजे, या वयात माझी ही अवस्था केली आहे. 90 वर्षांची झाले, कधी ताप आला नाही, आजारी पडले नाही, कधी औषधाची गरज पडली नाही, आता या वयात मला यातना दिली गेली, मला रुग्णालय, पोलिस स्टेशन, कोर्टात जावे लागेल. त्या नराधमाला फाशी झाल्यावरच मला चैन पडेल.

'देवाने मला खूप मजबूत मन दिले होते, कधीच अडचण आली नाही. त्याने वयाच्या 90 व्या वर्षी माझे भाग्य फोडले. एवढ्या यातना दिल्या की, माझे मन उद्धवस्त झाले. एक क्षणही धैर्य येत नाहीये.' 'माझ्या चेहऱ्यावर ठोसे मारले, दात नाहीये, हिरड्या फोडल्या, जेवणही करु शकत नाहीये. या म्हाताऱ्या आत्म्याला त्रास दिला, त्याला फाशीच द्यायला हवी.'

बलात्कार पीडित त्या वयस्कर महिलेने माझ्या कानाजवळ येऊन हळू आवाजात जे म्हटले ते शब्दात मांडणे कठीण आहे. त्या वेदना केवळ एक स्त्रीच समजू शकते. मला वाटते की, स्त्री मग ती सहा महिन्यांची निरागस असो किंवा नव्वद वर्षांची वयस्कर असो ती स्त्रीच असते.

जेव्हा त्या वयस्कर आजी आपल्यासोबत झालेल्या दुष्कर्माविषयी सांगत होत्या, कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्यांच्या पंधरा वर्षांच्या नातीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिचा चेहरा कोरडा होत होता. डोळे लाल होत होते. तिला जणू भीतीने तिला विळखा घातला होता. आजी सांगत होत्या, त्यांची सून, शेजारी महिला शांततेत ऐकत होत्या. त्यांच्या मनात काही पेटतं होतं, जे त्यांना सांगायचं होतं, पण त्या सांगू शकत नव्हत्या.

सात सप्टेंबरला काय झाले होते?
संध्याकाळचे चार वाजले असतील. पीडित वयस्कर महिला गावाच्या मंदिराजवळ आपल्या घराबाहेर बसल्या होत्या. शेजारील गावातील सोनू धीमर आपल्या स्कूटीवर आला आणि फसवणूक करुन त्याने वयस्कर महिलेला गाडीवर बसवले. त्या पीडित वयस्कर महिलेला दोन गावांच्या मध्यभागी असलेल्या जंगलात शेतात असलेल्या एका खोलीत घेऊन गेला. तिथे त्याने दोन तास आजीवर बलात्कार केला.

त्या सांगतात, 'तो म्हणाला तुमचा दुधवाला आला आहे त्याची भेट घालून देतो. रस्त्यात मी त्याला म्हणत राहिले की, मला जंगलाकडे कुठे नेत आहे, तर तो बोला शेतात दोन हजार रुपये ठेवले आहे, ते घेण्यासाठी जात आहे. मी म्हणाले मी पडून जाईल तरीही त्याने ऐकले नाही.'

'मी मोटारसायकलवरुन उतरले तर मला शेतात नेले. मला फरफटत शेतात नेले. माझे शरीर काट्यांनी चाळणी झाले. चार वाजता घेऊन गेला होता. सहा-सातवाजेपर्यंत मला सोडले नाही. मी त्याला म्हणत राहिले, ए भाऊ मला बाहेर घेऊन जा, माझा जीव घाबरतोय, मला घाम येतोय, पण त्याने ऐकले नाही. मला पूर्ण नग्न करुन असे फरफटत होता जसे कुत्र्यांना फरफटत नेतात. '

'मी याचना करत राहिले की मी तुझ्या आजीसारखे आहे, देव सर्व पाहत आहे, मात्र त्याने एकही ऐकले नाही. माझ्यासोबत असे दुष्कर्म केले जे तो करु शकत होता. त्याने तेही केले जे कुणीही कुणासोबत करु शकत नाही. माझ्या लॅटरीनच्या ठिकाणी जबरदस्ती केली.'

थरथरत्या आवाजात आजीने माझ्या कानाजवळ येऊन म्हणतात, 'मुली, माझा पूर्ण घसाही सोलला आहे. पाणीही पिऊ शकत नाही. त्या म्हणतात - त्याने मला शेतातच मारुन टाकले असते. पण मी पूर्ण हिंमतीने ओरडले, माझे नशीब चांगले होते की, काही लोक तेथे आले आणि मला वाचवले.'

वयस्कर आजींचा आवाज ऐकून घटनास्थळी आलेल्या एका तरुणाने सांगितले. 'तो खूप नशेत दिसत होता. त्याने आजीला पकडून ठेवले होते. दोरीने बांधले होते. मी त्याला पकडले आणि नंतर पोलिसांना बोलावले. पोलिस येईपर्यंत त्याला खूप मारले, तो एखादे ड्रग्स घेत होता असे वाटत होते. आम्ही तर त्याला जिवंत जाळले असते, पण पोलिस आले आणि त्याला पकडून नेले.'

स्थानिक लोकांनुसार, आरोपी नुकताच तुरूंगातून बाहेर आला होता. मारहाणीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. गावातील लोकांचे म्हणणे आहे की त्याने एका महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिच्या पतीसोबत मारहाण केली होती. याच प्रकरणात तो तुरुंगात गेला होता. त्याने एक वर्षांपूर्वी एका लहान मुलीसोबतही दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही गावातील लोकांनी त्याला खूप मारले होते मात्र प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले नव्हते.

महिलांमध्ये भीतीचे वातावरण
जवळपास पंन्नास वर्षांची शेजारची महिला सांगते, 'जर एखादी तरुण मुलगी असती किंवा आमच्यासारखी महिला असती तर लोक म्हणाले असते की, काय करायला गेली होती. सर्वांनी तिलाच दोष दिला असता. पण आता या 90 वर्षांच्या म्हातारीवर काय आरोप लावणार? गावातील सर्वात वयस्कर महिला आहे ही, पूर्ण गाव यांचा सन्मान करतो. आता त्यांच्यासोबतच असे झाले. आमच्या सारख्या महिलांनी कुठे जावे?'

त्या म्हणाल्या, 'पहिले रात्री-बेरात्री आम्ही घराबाहेर निघायचो, जंगलातही जायचो, पण आता विचार करुनच भीती वाटत आहे. सर्वच महिला घाबरलेल्या आहेत. हे दुष्कर्म महिलांसोबतच का होते?'

थरथरत्या आवाजात पीडिता आजीची पंधरा वर्षांची नात म्हणते, 'जर आमच्या आजीसोबत असे होऊ शकते तर कुणासोबतही होऊ शकते. आता तर शाळेत जायचीही भीती वाटते. शाळेचा रस्ताही सुनसान आहे.' पीडीत आजींचे मुलं म्हणतात, 'मला फोन आला की, तुमची आई रक्तबंबाळ झाली आहे. आम्ही पोहोचले तेव्हा पोलिस आरोपीला अटक करत होते.'

मेडिकल रिपोर्टमध्येही दुष्कर्म स्पष्ट
वयस्कर महिलेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांच्यासोबत दुष्कर्म झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रिपोर्टनुसार, त्यांच्या अवयवांमधून रक्तस्त्राव देखील झाला आहे. वैद्यकीय अहवालात असे म्हटले आहे की वृद्ध व्यक्तीवरही अनैसर्गिकपणेही बलात्कार करण्यात आला.

आजी वारंवार रडत रडत आपल्या जखमा दाखवत होत्या, पेटीकोट बाजूला करत काट्यांनी झालेल्या पायांवरील जखमा दाखवत होत्या. सुजलेले ओठ दाखवत होत्या, आपल्या जखमी हातांवर सुरकुत्या दाखवत होत्या. स्वतःचे दुःख वेदना समजावून सांगण्यासाठी त्या असे करत होत्या. त्या वारंवार म्हणत होत्या की, नराधमाला फाशीपेक्षा कमी काहीच होऊ नये. आजीच्या शरीरावर जखमा या मेडिकल रिपोर्टमध्ये दाखल आहेत. पण त्यांच्या आत्म्याला ज्या वेदना झाल्या, कदाचित त्या कोणालाही दिसणार नाहीत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser