आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००९ आणि २०१९ दरम्यान लोकसभेसाठी पुन्हा निवडून आलेल्या ७१ खासदारांची संपत्ती सरासरी २८६% पर्यंत वाढली आहे. २००९ मध्ये ७१ खासदारांची सरासरी संपत्ती ६.१५ कोटी होती, जी २०१४ मध्ये वाढून १६.२३ कोटी झाली. येत्या पाच वर्षांत म्हणजे, २०१९ मध्ये ही १७.५९ कोटी रु. वाढून २३.७५ कोटी झाली.
या खासदारांनी दिलेल्या प्रतीज्ञापत्राच्या आधारावर असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स(एडीआर)- नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात ही माहिती दिली आहे. यामध्ये भाजपच्या ४३, काँग्रेसच्या १०, तृणमूल काँग्रेसच्या ७, बीजद आण शिवसेनेचे २-२ खासदार आहेत. दुसरीकडे, जेडीयू, एआयएमआयएम, एआयईयूडीएफ, आययूएमएल, एनसीपी, शिराेमणी अकाली दल आणि नॅशनल कॉन्फरन्सचे एक-एक खासदार आहेत. भाजप खासदारांची संपत्ती सरासरी १५ कोटी वाढली.
सुप्रिया सुळेंची संपत्ती ८९ कोटींनी वाढली आकडेवारीनुसार, सर्वात जास्त १५७ कोटींची संपत्ती अकाली दल पक्षाच्या हरसिमरत कौर बादल यांची वाढली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची ८९ कोटी रु. संपत्ती वाढली आहे.
३ सदस्यांच्या संपत्तीत ११००-४०००% वाढ वीजापूरचे भाजप खासदार रमेश चंदप्पा जिगजिगानी१.१८ कोटी रु.वरून होती. ती २०१४ मध्ये ८.९४ कोटी झाली.यासोबत तीन खासदारांची संपत्ती ११०० ते ४०००% वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.