आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायवृंदाने(कॉलेजियम) न्या. मुनिश्वरनाथ भंडारी यांना मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती करण्याची शिफारस केली आहे. यासोबत कॉलेजियमने मध्य प्रदेश उच्च न्यायालयासह तीन राज्यांच्या हायकोर्टात न्यायाधीशांच्या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी १७ नावांना हिरवी झेंडी दाखवली आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व ओडिशा हायकोर्टात १७ न्यायमूर्तींची नियुक्ती होईल.
१४ डिसेंबर २०२१ आणि २९ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीत या नावांवर विचार झाला होता. कॉलेजियममध्ये वरिष्ठ न्यायमूर्ती यू.यू.ललित आणि न्या. ए.एम.खानविलकरही आहेत. डिसेंबर आणि जानेवारीत झालेल्या कॉलेजियमच्या बैठकांत मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुनिश्वरनाथ भंडारी यांना याच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती करण्याचीही शिफारस केली आहे.
न्या. भंडारी मूळ राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. ते सध्या मद्रास उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना मुख्य न्यायमूर्ती करण्याची शिफारस केली आहे. आता केवळ नियुक्ती प्रक्रिया शिल्लक आहे.
कॉलेजियम : मध्य प्रदेशसह ३ हायकोर्टांना मिळणार न्यायमूर्ती
मप्र हायकोर्ट : कॉलेजियमने मप्र हायकोर्टातही सहा जज नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. यात तीन वकील मणिंद्रसिंग भाटी, द्वारकाधीश बन्सल व मिलिंद रमेश फडके आहेत. ३ न्यायिक अधिकारी अमरनाथ केशरवानी, प्रकाशचंद्र गुप्ता व इंदूरचे जिल्हा जज दिनेशकुमार पालीवाल आहेत.
आंध्र प्रदेश : ७ वकिलांच्या आंध्र प्रदेश हायकोर्टात जज नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. हे सात वकील आहेत- कोनाकांती श्रीनिवास रेड्डी, गन्नमनेनी रामकृष्ण प्रसाद, व्यंकटेश्वरलू निम्मगड्डा, तरलदा राजशेखर राव, सत्ती सुब्बा रेड्डी, रवी चिमालपती आणि वद्दीबोयाना सुजाता.
ओडिशा हायकोर्ट : ओडिशा उच्च न्यायालयात ४ वकिलांना न्यायमूर्ती करण्याची शिफारस केली आहे. ओडिशा हायकोर्टासाठी व्ही.नरसिंह, संजय कुमार मिश्रा, ब्रज प्रसन्न सत्पथी आणि रमण मुरारी यांच्या नावांची शिफारस केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.