आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bharat Band Chakka Jam 26 February Update | All India Transporters Welfare Association Protest Against Rising Fuel Prices, GST Today Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GST आणि तेल किंमतींविरोधात भारत बंद:आज सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक आणि बाजार बंद ठेवण्याचे आवाहन, 8 कोटी व्यापाऱ्यांचे समर्थन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • GST दुरुस्तीमध्ये अधिकाऱ्यांना जास्त अधिकार, व्यापाऱ्यांसाठी संकट

ई-वे बिल, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि वस्तू व सेवा कर (GST) यावरुन आज अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (कॅट) भारत बंदची हाक दिली आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर वेलफेअर असोसिएशन (AITWA) आणि इतर संस्थांनीही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

देशभरात 1,500 ठिकाणी निदर्शने
कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले - शुक्रवारी देशभरातील 1,500 ठिकाणांवर निदर्शने केली जातील. सर्व बाजारपेठा बंद राहतील. 40 हजाराहून अधिक व्यावसायिक संघटनांशी संबंधित सुमारे 8 कोटी व्यापारी बंदला पाठिंबा देत आहेत.

GST दुरुस्तीमध्ये अधिकाऱ्यांना जास्त अधिकार, व्यापाऱ्यांसाठी संकट
कॅटच्या मते, गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी आणि त्यानंतर जीएसटी नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. यात अधिकाऱ्यांना बरेच अधिकार देण्यात आले. आता कोणताही अधिकारी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यापाऱ्याचा जीएसटी नोंदणी क्रमांक निलंबित किंवा रद्द करू शकतो. बँक खाते आणि मालमत्ता जप्त करू शकतो. खास गोष्ट म्हणजे हे करण्यापूर्वी व्यावसायिकाला कोणतीही नोटीस दिली जाणार नाही. हे व्यावसायिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

ई-वे बिलात बदल झाल्यामुळे ट्रान्सपोर्टर्स व व्यापारी नाराज आहेत
ई-वे बिलाची मर्यादा 100 किमी वरून 200 किमी पर्यंत वाढवण्यात आल्याने 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन ई-वे बिलाच्या नियमाशी परिवहन आणि व्यापारी चिंतेत आहेत. खरं तर, 2021-22 च्या अर्थसंकल्पात, ई-वे बिलाच्या कलम 129 मध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार, जर बिलात काही चूक झाली असेल तर कर आणि दंड दोन्ही आकारला जाईल. तसेच जो टॅक्स पहिले परत होत होता, तो आता होणार नाही. म्हणजेच, अनवधानाने छोटीशी चूक झाली तर पेनल्टी आणि दंड दुप्पट वसूल केला जाईल.

निषेध म्हणून परिवहन कार्यालये बंद राहतील
नवीन ई-वे बिल कायद्याच्या विरोधात सर्व राज्य परिवहन संघटनांनीही कॅटला पाठिंबा दर्शविला आहे. या काळात परिवहन कार्यालये बंद राहतील. बुकिंग, वितरण, वस्तूंचे लोडिंग आणि अनलोडिंग बंद राहील. सर्व परिवहन कंपन्यांना सकाळी सहा ते रात्री आठ या दरम्यान वाहने पार्क करण्यास सांगितले आहे.

काही संस्था समाविष्ट नाहीत
परिवहन क्षेत्राशिवाय मोठ्या संख्येने राष्ट्रीय व्यापार संघटनांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये ऑल इंडिया FMCG डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ अॅल्यूमीनियम यूटेंसिल्स मॅन्यूफॅक्चरर्स एंड ट्रेडर्स एसोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पाईसिस ट्रेडर्स असोसिएशन, ऑल इंडिया वूमेन एंटेरप्रेनियर्स असोसिएशन, ऑल इंडिया कम्प्यूटर डीलर असोसिएशन आणि ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन आदींचा समावेश आहे.

तर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (AIMTC) आणि भाईचारा ऑल इंडिया ट्रक ऑपरेटर वेलफेअर असोसिएशन (BAITOWA) विरोध प्रदर्शनात सामिल होणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...