आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bharat Bandh Chakka Jam Explained; Farmers Protest (Kisan Andolan) | Rakesh Tikait | Haryana Punjab Bihar Farmers Latest News And Sanyukt Kisan Morcha Road Block

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सप्लेनर:शेतकऱ्यांच्या 3 तासांच्या चक्काजाममध्ये काय-काय होणार, कुणाला मिळणार सूट, जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 शेतकरी संघटनांद्वारे बनवण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चाने हे चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी आज दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन करणार आहेत. दुपारी 12 वाजेपासून 3 या दरम्यान या चक्काजाममध्ये रुग्णवाहिका आणि शाळेच्या बस यांसारख्या आवश्यक सेवांना सूट दिली जाणार आहे.

26 जानेवारीपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी हे चक्काजाम आंदोलन का पुकारले आहे? आंदोलनात कोणकोणत्या संघटना सामिल आहेत? चक्काजामदरम्यान काय होणार? पोलिसांची काय तयारी आहे? चला जाणून घेऊया...

आजचे चक्काजाम आंदोलन कुणी पुकारले?
चक्काजाम आंदोलन करत असलेल्या 40 शेतकरी संघटनांद्वारे बनवण्यात आलेल्या संयुक्त किसान मोर्चाने हे चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. शनिवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे. या दरम्यान गाड्यांना रोखले जाईल. सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जाम केले जातील.

चक्काजाम आंदोलन का पुराकले?
एक फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मागणीव दुर्लक्ष करणे आणि दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या आंदोलनस्थळी इंटरनेट बंद केल्याच्या विरोधात हे चक्काजाम आंदोलन केले जात आहे. शेतकरी संघटनांनी म्हटले की, 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीनंतर अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जब्त करण्यात आले आहेत. दिल्ली बॉर्डरच्या आजुबाजूच्या सर्व जागा ब्लॉक करण्यात आल्या आहेत. या सर्वांविरोधात हे चक्काजाम आंदोलन केले जात आहे.

चक्काजाम कोणत्या परिसरांमध्ये होणार
भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत म्हणतात की, दिल्लीमध्ये आम्ही चक्काजाम करणार नाही. येथे स्वत: राजाने तटबंदी केली आहे. तिथे आम्हाला चक्काजाम करण्याची गरज नाही. याव्यतिरिक्त यूपी आणि उत्तराखंडमध्येही चक्काजाम आंदोलन केले जाणार नाही. मात्र टिकैत यांनी या ठिकाणी चक्काजाम का केले जाणार नाही याचे कारण सांगिलेले नाही. हे तीन राज्य वगळता देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जाम केले जाणार आहेत.

या चक्काजाममधून शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा आहे
या चक्काजाममधून शेतकऱ्यांना आपली एकता दाखवायची आहे. 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसेनंतर शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन महत्त्वाचे झाले आहे. संयुक्त किसान मोर्चाचे नेते सिंघू आणि टिकरी सीमेवर या संपूर्ण चक्काजामचे नियोजन करतील.

चक्काजाम दरम्यान काय होणार
टिकैत यांच्यानुसार 12 ते 3 वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या चक्काजामदरम्यान ज्या गाड्या रोखल्या जातील, त्यांनना जेवण आणि पाणी दिले जाईल. यासोबतच सरकार शेतकऱ्यांसोबत काय करत आहे हे देखील सांगितले जाईल. या दरम्यान आपात्कालीन आणि आवश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका, शाळेच्या बस या रोखल्या जाणार नाहीत. दुपारी 3 वाजता चक्काजाम संपल्यानंतर एकाच वेळी एक मिनिटासाठी गाड्यांचे हॉर्न वाजवले जातील.

चक्काजाम पाहता पोलिसांची काय तयारी आहे?
दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमांवर सुरक्षा वाढवली आहे. आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी पहिलेच मल्टी लेअर बॅरिकेडिंग केली आहे. हरियाणा पोलिसांनीही सुरक्षेचा बंदोबस्त वाढवला आहे.

अखेर शेतकऱ्यांची काय मागणी आहे? यावर सरकारचे काय म्हणणे आहे?
आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या 4 मागण्या आहेत. यासाठीच गेल्या 72 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. या आहेत त्यांच्या मागण्या...

1. शेती संबंधीत तीन कायदे रद्द करावेत. शेतकऱ्यांनुसार याने कॉर्पोरेट घराण्यांना फायदा होईल.
सरकारचे मत : कायदे रद्द केले जाऊ शकत नाही. यावर संशोधन करु शकतो.

2. MSP चा कायदा करावा, यामुळे योग्य दर मिळू शकतील.
सरकारचे मत : आंदोलन संपवण्यासाठी तयार असाल, तर आश्वासन देऊ शकतो.

3. नवीव वीज कायदा येऊ नये, कारण यामुळे शेतकऱ्यांना वीजेवर मिळणारी सब्सिडी समाप्त होईल.
सरकारचे मत : वीज कायदा 2003 हाच लागू राहिल. नवीन कायदा येणार नाही.

4. पेंढ्या जाळल्यानंतर 5 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांच्या दंडाचा प्रस्ताव मागे घ्यावा.
सरकारचे मत : पेंढी जाळल्यावर कोणत्याही शेतकऱ्याला तुरुंगवास होणार नाही. सरकार ही तरदूद हटवण्यासाठी तयार आहे.

शेती संबंधीत तीन कायदे कोणते आहेत...

  1. शेतकरी व्यापार व वाणिज्य उत्पादन (प्रोत्साहन व सुलभता) कायदा: शेतकरी सरकारी मंड्यां (एपीएमसी)च्या बाहेर उत्पादन विकू शकता. अशा खरेदी-विक्रीवर कर लागणार नाही.
  2. शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व शेत सेवा कायदा सर्व्हिस करारः शेतकरी कॉन्ट्रॅक्टर करुन पहिलेच ठरलेल्या किंमतीवर आपले उत्पादन विकू शकतात.
  3. जीवनावश्यक वस्तू (अमेंडमेंट) कायदा: तृणधान्ये, डाळी, तेलबिया, खाद्यतेल, बटाटे आणि कांदे आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. केवळ युद्ध, भूक, नैसर्गिक आपत्ती किंवा उच्च चलनवाढ अशा परिस्थितीत स्टॉक मर्यादा निश्चित केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...