आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bharat Bandh Farmers Protest News: Kisan Andolan LIVE Update | Bharti Kisan Union (BKU) President Rakesh Tikait Dharmendra Malik Strategy Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:संयुक्त किसान मोर्चाकडून आज भारत बंदचे आवाहन; परंतु, आधी सारखी आंदोलनाची चर्चा नसल्याने शेतकरी नेत्यांनी बदलले धोरण

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंदोलन कमजोर झाल्याचा प्रचार भाजप करतेय - राकेश टिकैत

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात संपूर्ण भारत देशातील शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करत आहे. आज याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, या बंदला जसा प्रतिसाद जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पाहायला मिळाला होता तसा प्रतिसाद आता मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन कमजोर होतोय की काय? अशी चर्चा आज घडीला लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. कारण आदोलनांच्या सुरुवातीला लोकांमध्ये जो उत्साह किंवा रस होता तो आता कमी होतांना दिसत आहे. यामुळे मीडियाचे लक्ष सुद्धा शेतकरी आंदोलनावर नाही आहे.

गेल्या चार महिन्यांमध्ये सरकार आण‍ि शेतकरी नेत्यांमध्ये जवळपास ११ बैठकी झाल्या. परंतु, कोणत्याच बैठकीमध्ये त्यावर तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या कायद्याच्या प्रस्तावाला दीड वर्षासाठी स्थगिती दिली आहे. परंतु, शेतकरी हे कायदे रद्द करण्याच्या मागणी वर अडलेले आहे.

आंदोलन कमजोर झाल्याचा प्रचार भाजप करतेय - राकेश टिकैत
भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश सांगतात की, शेतकरी आंदोलन हे पूर्वीसारखेच असून सत्ताधारी पक्ष भाजप आंदोलन कमजोर होत असल्याचा प्रचार व प्रसार करतोय. ते पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला मीडियाने दाखवणे बंद केले आहे. परंतु, हे आंदोलन आजही त्याच ताकदीने उभे असून जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचे टिकैत यांनी सांगितले.

काय असणार आंदोलनाचा 'रोटेशन फार्मूला'
दिल्लीच्या गाजीपुर बॉर्डर, टीकरी बॉर्डर आण‍ि सिंघू बॉर्डर शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. परंतु, शेतकर्‍यांची संख्या कमी होत असल्याने शेतकरी नेत्यांनी एक नवीन धोरण बनवले आहे. यामुळे ते गावागावात जाऊन बैठकीचे आयोजन करीत आहे. पंजाब, हरियाना आण‍ि पश्चिम उत्तरप्रदेशामधील अनेक गावात शेकडो बैठकी घेण्यात आल्या आहे. या बैठकीमध्ये एका गावांतून
10-30 लोकांचा समूह बनवून त्यांना बॉर्डर पाठवण्यात येते आहे. आणि उरलेल्या लोकांना शेती सांभाळण्याचे काम दिलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...