आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Bharat Biotech | Coronavirus Covaxin Vaccine Dosage Price India Update; Bharat Biotech On Narendra Modi Government; News And Live Updates

लसीच्या किंमतीवर युक्तिवाद:भारत बायोटेक म्हणाले - सरकारला फार काळापर्यंत 150 रुपयांत कोव्हॅक्सीनचे डोस देऊ शकत नाही

हैदराबाद4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • भारत बायोटेकचे लसींच्या किंमतीवर 6 युक्तीवाद

भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लसींच्या किंमतीवर मोठे विधान केले आहे. कंपनीने म्हटले की, केंद्र सरकारला आम्ही कोव्हॅक्सीनचे एक डोज 150 रुपयांत उपलब्ध करुन देत आहोत. परंतु, फार काळापर्यंत उपलब्ध करुन देता येणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. खाजगी बाजारपेठेत असणारी लसची स्वतंत्र किंमत ही त्याची भरपाई करण्यासाठी असल्याचे लस उत्पादकांनी सांगितले.

भारत बायोटेकचे लसींच्या किंमतीवर 6 युक्तीवाद

 • वेगवेगळ्या किंमती असूनही कोव्हॅक्सीनच्या एका डोसची सरासरी किंमत 250 रुपये येत असल्याचे आम्हाला वाटते. आम्ही कोणतीही लस तयार केल्यास त्याचा मोठा भाग केंद्राला जाणार आहे. केंद्र सरकार आमच्याकडून 150 रुपयांला एक डोस खरेदी करत आहे. 25% खाजगी बाजारात जाईल.
 • केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, आमच्या उत्पादनातील 10% खासगी रुग्णालयात जाईल. उर्वरित लस ही केंद्र व राज्य सरकारकडे जाईल. अशा परिस्थितीत पुरविल्या जाणार्‍या लसीची सरासरी किंमत 250 रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल.
 • कंपनीने लस उत्पादन, विकास, क्लिनिकल ट्रायल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सेटअपमध्ये 500 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार ज्या किंमतीत लस खरेदी करत आहे. त्यामुळे आमच्या गुंतवणूकीची भरपाईदेखील केली जात नाहीये.
 • केंद्र सरकारला फार काळापर्यंत 150 रुपयांत लस उपलब्ध करुन देता येणार नाही. यासाठी आम्हाला खासगी बाजारात याची किंमत वाढवत भरपाई काढावी लागणार आहे.
 • जगात सध्या लसीच्या अशीही उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, मानवी पॅपिलोमा व्हायरस लसीचा एक डोस गावी अलायन्सला 329 रुपयांना दिला जातो. परंतु, खासगी बाजारात त्याची किंमत 3500 रुपये आहे. रोटाव्हायरस सरकारला 60 रुपयांना दिले जाते. परंतु, खासगी बाजारात त्याची किंमत 1700 रुपये आहे. कोरोना लसीची आंतरराष्ट्रीय किंमत 730 ते 2700 रुपयांपर्यंत आहे.
 • खाजगी रुग्णालयांना ही लस घ्यायची आहे की नाही हेदेखील त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. यामुळे ज्या नागरिकांनी जास्त दर दिले आहेत त्यांना लसीकरणाची सुविधा मिळणार आहे.

केंद्र सरकारने कोव्हॅक्सीनच्या 19 कोटी डोसचे ऑर्डर दिले
राज्यांना मोफत लस देण्याच्या घोषणेनंतर आरोग्य मंत्रालयाने 44 कोटी लसींचे ऑर्डर जारी केला होते. यामध्ये 25 कोटी कोव्हीश‍ील्ड आणि 19 कोटी कोव्हॅक्सीनचा समावेश आहे. केंद्र सरकारने ऑर्डरची 30% रक्कम कंपन्यांना आधीच दिली होती.

बातम्या आणखी आहेत...