आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bharat Biotech Covaxin Vaccine Latest Clinical Trials Results | Bharat Biotech Phase 3 Clinical Trials For Covaxin

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोव्हॅक्सिनदेखील पास:भारत बायोटेकने जारी केले क्लीनिकल ट्रायल्सचे परिणाम, कोव्हॅक्सिन 81% परिणामकारक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात व्हॅक्सीन परिणामकारक

भारत बायोटेकने स्वदेशी व्हॅक्सीन कोव्हॅक्सिनबाबत मोठी बातमी दिली आहे. कंपनीने बुधवारी व्हॅक्सीनच्या फेज-3 क्लीनिकल ट्रायल्सचे रिझल्ट जाहीर केले. यानुसार, कोव्हॅक्सिन 81% परिणामकारक सिद्ध झाली आहे. सरकारने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात व्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. सरकारच्या या निर्णयाचा जानकारांनी विरोध केला होता, कारण फेज-3 चे परिणाम पाहिल्याशिवाय व्हॅक्सीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती.

हैदराबादमधील कंपनी भारत बायोटेकने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळून ही व्हॅक्सीन तयार केली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठ्या लोकांनी याच कंपनीची लस घेतली आहे.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात व्हॅक्सीन परिणामकारक

भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कृष्णा एल्ला म्हणाले की, हे आमच्यासाठी खूप मोठे यश आहे. क्लीनिकल ट्रायल्सच्या तिन्ही फेजमध्ये आम्ही 27 हजार वॉलंटिअर्सवर व्हॅक्सीनचा प्रयोग केला होता. फेज-3 क्लीनिकल ट्रायल्सच्या रिझल्टसह सिद्ध झाले की, कोव्हॅक्सिन कोरोनाच्या आधीच्या आणि नवीन स्ट्रेनशी सामना करू शकते.

बातम्या आणखी आहेत...