आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयसीएमआरसोबत स्वदेशी कोरोना लस तयार करत असलेल्या भारत बायोटेकला “कोव्हॅक्सिन’च्या चाचणीसाठी स्वयंसेवक मिळत नसल्याने स्वदेशी लस अडचणीत आली आहे. एम्सने बुधवारी सांगितले की, कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ७० ते ८० टक्के लोक नकार देत आहेत.
डॉक्टरांनुसार, लसीची चाचणी सुरू झाली तेव्हा १०० लोकांची गरज होती आणि ४५०० लोकांनी अर्ज भरले होते. दुसऱ्या टप्प्यात ५० लोक हवे होते ४ हजार जणांनी इच्छा व्यक्त केली. आता तिसऱ्या टप्प्यात १५०० ते २००० लोक हवे आहेत, परंतु फक्त २०० लोकच तयार झाले आहेत.
कोव्हॅक्सिन पहिल्या चाचणीत परिणामकारक :
भारत बायोटेकची ही लस पहिल्या टप्प्यातील चाचणीत पूर्ण सुरक्षित व परिणामकारक ठरली आहे. याचे फार गंभीर दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. २ ते ८ अंश तापमानात ही लस सुरक्षित राहू शकते. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून अद्याप त्याचा परिणाम समोर आलेला नाही. देशात ज्या प्रमुख तीन लस निर्मात्यांनी आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे त्यात कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.