आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bharat Biotech Sought Emergency Use Approval, Providing Test Data For Up To 56 Days On Children

लस:भारत बायोटेकने मागितली आपत्कालीन वापराची मंजुरी, मुलांवर 56 दिवसांपर्यंतच्या चाचणीचा डेटा दिला

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत बायोटेकने देशात २ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) परवानगी मागितली. पुढील आठवड्यात एसईसीच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो. भारत बायोटेकने २-७, ८-१२ व १३-१७ वर्षांच्या मुलांचे ३ गट बनवले. प्रत्येक गटात १७५ मुलांना समाविष्ट केले. गटात समाविष्ट मुलांना कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस देऊन इम्युनोजेनेसिटीचा आकडा एकत्र केला जात आहे. आतापर्यंत लस टोचवल्याच्या ५६ दिवसांपर्यंतचे आकडे भारत बायोटेककडून सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे (सीडीएससीओ) सोपवले आहेत. हा तात्पुरता आकडा आहे. कंपनीने या वयोगटातील मुलांसाठी लस चाचणी परवानगी मागितली होती तेव्हा २०८ दिवसांपर्यंत इम्युनोजेनेसिटीची आकडेवारी देण्यास सांगितले होते.

कंपनीकडून सर्व ५६ दिवसांच्या आकडेवारीच्या आधारावर अंतरिम अहवाल दिला आहे. सूत्रांनुसार, मुले व प्रौढांत या लसीचा परिणाम जवळपास एकसमान आहे. मुले आणि प्रौढांना दिल्या जाणाऱ्या लसीतही कोणताही बदल नाही.

बातम्या आणखी आहेत...