आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जोडाे यात्रेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत चालणारे नेते-कार्यकर्ते सडपातळ होत आहेत. कन्याकुमारीपासून राहुल यांच्यासोबत सहभागी झालेले असे १२० नेते, कार्यकर्ते आहेत. भास्करने सहभागींशी, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ८० टक्क्यांपेक्षा जास्त सहभागींचे वजन ५ ते १३ किलोपर्यंत घटले आहे. यात्रेत रुग्णवाहिका,डॉक्टरांची टीम असते.{यात्रेचा गुरुवारी ८६ वा दिवस होता. आतापर्यंत २२५० किमी चालले आहे.
चालण्याची सवय नव्हती... सुरुवातीस अडचण... {राजस्थान यूथ बाेर्डाचे अध्यक्ष सीताराम लांबाही भारत यात्री आहेत. ते म्हणाले, माझे वजन आधी ७८ किलो होते. आता ७० किलो आहे. आधी अशी जीवनशैली कधी नव्हती. सकाळी ४ वाजता उठतो, रोज सरासरी २५ किमी चालतो. नाष्टा, लंच चांगले घेतो. डिनर हलके घेतो.
{यात्रेत सहभागी कोटाचे विवेक भटनागर म्हणाले- सर्वांचे वजन ७ ते १३ किलोपर्यंत घटले आहे. माझे ८३ वरून ७४ किलो झाले. तळलेले व मसाल्याचे पदार्थ खात नाही. २०-२५ दिवस सर्वांना अडचणी आल्या. कारण, एवढे चालण्याची सवय नव्हती.
{कोटा मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. मनोज सालुजा म्हणाले, १ किमी चालल्याने सकाळी ३० ते ४० कॅलरी बर्न होतात. रोज २५ किमी चालल्याने शरीरात फॅट तयार हाेत नाही.
पोलिस बुटात चालणे कठीण, प्रथमच स्पोर्ट्स शूज घालणार पोलिसांचे ६०० जवान व अधिकारी प्रथमच व्हीआयपी ड्यूटीत वर्दी पॅटर्न बदलत स्पोर्ट्स शूज घालतील. यात्रेची सुरक्षा व्यवस्था पाहता राजस्थान पोलिसांचे ५ अधिकारी एमपीत गेले होते. त्यांच्या चर्चेतून हा निर्णय घेतला आहे. पोलिस बूट घालून चालणे कठीण होते. हे बूट वजनदार व कडक तळव्याचे असतात.त्यामुळे जवानांची ड्यूटी एक दिवसाआड करण्याचा विचार केला जात आहे. {राहुल यांच्यासोबत क्लॉज प्रोटेक्शन टीममध्ये ३०० पोलिस चालतील. जवानांची निवड करून त्यांचा सराव केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.