आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो यात्रेने' तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील प्रवास पुर्ण केला असून आता राजस्थानमध्ये यात्रा पोहचली आहे. भारत जोडो यात्रेचा 100 वा दिवस आहे.
आज शहरात दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांच्यासमोर सचिन पायलट यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. दौसा जिल्हा हा पायलट कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पायलट हे येथील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. सचिन पायलट आता इथून निवडणूक लढवत नसले तरी ते येथील लोकांच्या मनात आहेत. सध्या पायलट ग्रुपचे समर्थक मुरारीलाल मीणा हे दौसा विधानसभेचे आमदार आहेत. आजच्या यात्रेत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्यासोबत स्थानिक नेतेही आहेत. दौसा शहरात प्रचंड गर्दीमुळे प्रवासाचा वेग मंदावला आहे.
राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा आज 12 वा दिवस आहे. आज ही यात्रा एकाच टप्प्यात सुमारे 22 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. आज चहाचा ब्रेक न घेता थेट जेवणाचा ब्रेक घेण्यात आला. यानंतर राहुल गांधी हेलिकॉप्टरने जयपूरला जाणार आहेत. भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आज जयपूर येथील नवीन पीसीसी कार्यालयात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची राजस्थानमधील ही पहिलीच पत्रकार परिषद असेल.
जयराम रमेश म्हणाले - काँग्रेस निवडणूक लढवणार
काँग्रेस संघटना निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. संघटना जिंकेल, काँग्रेस पक्ष जिंकेल. मुख्यमंत्री कोण होणार हे नंतर कळेल. काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी सर्व नेते, सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. मी याआधीही म्हटले आहे की, संघटना सर्वोपरि आहे. लोक येतात, लोक जातात. व्यक्ती पदे घेतात, व्यक्ती पदे सोडतात पण संस्था अबाधित राहत असते.
यात्रेतील प्रमुख अपडेट
राजस्थानमधील आजच्या यात्रेचे फोटो...
हरियाणात भारत जोडो यात्रा 21 तारखेपासून
हरियाणामध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. येथून दोन टप्प्यात प्रवास सुरू होईल. पहिल्या टप्प्यात ही यात्रा 21 डिसेंबरला हरियाणात दाखल होणार आहे. राहुल गांधी त्यांच्या तीन दिवसांच्या राज्य दौऱ्यात 80 किलोमीटरहून अधिक चालणार आहेत. हरियाणात राहुल गांधी महात्मा गांधींशी संबंधित ऐतिहासिक गांधीग्राम सोहना येथेही पोहोचणार आहेत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
RBIचे माजी गव्हर्नर भारत जोडो यात्रेत सहभागी
RBI चे माजी गव्हर्नर एन रघुराम राजन आज राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत. राहुल गांधी यांनी राजन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. चहाच्या ब्रेकपर्यंत दोघेही सतत बोलत होते. रघुराम राजन हे आर्थिक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडत आहेत. भारत जोडो यात्रेत विविध भागातील लोक सातत्याने सामील होत आहेत हे विशेष.
राहुल गांधी आणि रघुराम राजन यांच्यात अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. एका डॉक्युमेंटरीसाठी दोघांनीही आर्थिक मुद्द्यांवर आपली मते मांडली. यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात रघुराम राजन यांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनवण्यात आले होते. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.