आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा बुधवारी तिसरा दिवस होता. ही यात्रा तिसऱ्या दिवशीही कोटामध्ये होती. सुमारे साडेतीन तासांनी गोपाळपुरा येथे चहाचा ब्रेक घेण्यात आला. लाडपुराचे उपप्रमुख अशोक मीणा यांच्या निवासस्थानी राहुल आणि त्यांच्यासोबत आलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 40 मिनिटे घरात नेते बसलेले होते. यादरम्यान अशोक मीना यांची आई उर्मिला बाहेरच राहिल्या.
दिव्य मराठी नेटवर्कने या बाबत विचारले असता उर्मिला यांनी सांगितले की, त्या गावातील घरी होत्या. त्या तिथून इथे येईपर्यंत सुरक्षा तपासणीची प्रक्रिया संपली होती. पास न मिळाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यामुळे बाहेर वाट पाहत बसावे लागले.
राहुल यांचा बिर्ला यांना टोमणा, म्हणाले- लोकसभेत कॅमेरा स्पीकरवरच राहतो
सायंकाळी नुक्कड सभेत राहुल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना टोला लगावला. ते म्हणाले- लोकसभा टीव्हीला फक्त स्पीकरचा चेहरा आवडतो, कॅमेरा विरोधकांकडे वळत नाही. कोटाच्या केवल नगरमध्ये झालेल्या स्ट्रीट कॉर्नर सभेत राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, आज भाजप, आरएसएसने सर्वांना दडपून टाकले आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. आमचे माइक बंद असतात. लोकसभेत कॅमेरा विरोधकांकडे वळत नाही. लोकसभा अध्यक्ष राजस्थानचे आहेत, लोकसभा टीव्हीला त्यांचा चेहरा आवडतो, तेच दाखवले जातात.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी आज सवाईमाधोपूरला जाणार
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतात. सोनिया गांधी गुरुवारी सकाळी 9 वाजता जयपूरला पोहोचतील. जयपूर विमानतळावरून सोनिया गांधी बुंदी आणि नंतर सवाईमाधोपूरला जातील. सकाळी 11 वाजता यात्रा संपल्यानंतर राहुल गांधी सवाईमाधोपूरलाही जाणार आहेत.
सोनिया गांधी आपला वाढदिवस सवाईमाधोपूरमध्ये साजरा करणार आहेत. प्रियांका गांधीही सवाईमाधोपूरला पोहोचू शकतात. 10 डिसेंबर रोजी सोनिया गांधी बुंदी जिल्ह्यातील राहुल यांच्या यात्रेत सामील होऊ शकतात. 10 डिसेंबरला यात्रेत राहुलसोबत फक्त महिलाच असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.