आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Bharat Jodo Yatra In Agar Malwa On Last Day Of Madhya Pradesh Will Enter Rajasthan In The Evening | Congress News

राजस्थानमध्ये 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा दिवस:भाजप कार्यकर्त्यांना राहुल यांचे Flying Kiss; 10 KM नंतर घेतला लंच ब्रेक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो यात्रेने' तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील प्रवास पुर्ण केला असून आता राजस्थानमध्ये यात्रा पोहचली आहे. राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे.

सकाळी सहाच्या सुमारास झालावाडच्या क्रीडा संकुलापासून यात्रेला सुरुवात झाली. यादरम्यान जिल्हा भाजप कार्यालयासमोरुन भारत जोडो यात्रा निघाली, तेव्हा राहुल यांची प्रतिक्रिया पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. भारत जोडो यात्रा पाहण्यासाठी भाजप कार्यालयात सकाळपासूनच गर्दी झाली होती. राहुलची नजर त्यांच्यावर पडताच राहुल यांनी फ्लाइंग किस देऊन त्यांना अभिवादन केले.

भारत जोडो यात्रेने सुमारे दहा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून दुपारच्या जेवणाचा ब्रेक घेतला. दुसऱ्या टप्प्यात यात्रा झालावाड जिल्ह्यातील देवरी घाटापासून सुरू होऊन कोटा जिल्ह्यात दाखल झाली. मंगळवारच्या यात्रेचा दुसरा टप्पा दुपारी 3.30 वाजता सुरू झाला. दरम्यान प्रवासात अचानक एक डुक्कर घुसले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच त्याला पळवून लावले.

मंगळवारी सकाळी यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेता कन्हैया कुमारने भाजपवर हल्लाबोल करत गुजरात निवडणुकीत भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, मतदानाच्या दिवशी भाजपने पीएम मोदींच्या रोड शोमध्ये प्रचार केला.

झालावाड येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उभ्या असलेल्या लोकांना राहुल यांनी अभिवादन केले. तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
झालावाड येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उभ्या असलेल्या लोकांना राहुल यांनी अभिवादन केले. तेव्हा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भारत जोडो यात्रा आज दुपारनंतर झालावाड येथून कोटा जिल्ह्यात दाखल होईल. आजच्या प्रवासात सुमारे 23 कि.मी. प्रवास केला जाईल. पुढील चार दिवस ही यात्रा कोटा जिल्ह्यात राहणार आहे.

आजच्या प्रवासात मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा हेही सकाळपासून सोबत आहेत. याशिवाय केंद्रीय नेतृत्वातून केसी वेणुगोपाल यांच्यासह अन्य नेतेही दिसत आहेत.

यात्राने राजस्थानमध्ये प्रवेश केल्यानंतर राजस्थान काँग्रेसला नवे प्रभारी मिळाले आहेत. माकन यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे वरिष्ठ नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांची पक्षाने प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. रंधावा यांची काँग्रेस सुकाणू समितीचे सदस्य म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल गांधी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हजारो लोकांसह मंगळवारी सकाळी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले. पहिल्या दिवशी भारत जोडो यात्रेने राजस्थानमध्ये सुमारे 34 किमी अंतर कापले होते.
राहुल गांधी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हजारो लोकांसह मंगळवारी सकाळी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले. पहिल्या दिवशी भारत जोडो यात्रेने राजस्थानमध्ये सुमारे 34 किमी अंतर कापले होते.

येत्या 9 डिसेंबरला यात्रा ब्रेक घेणार आहे. यापूर्वी सोमवारी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा मतदारसंघ असलेल्या झालावाड जिल्ह्यात काँग्रेसने गर्दी जमवून राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यात्रेदरम्यान सॉफ्ट हिंदुत्वावर भर दिल्याचे दिसून आले. यात्रेच्या मार्गात येणाऱ्या काही मंदिरांनाही ते भेट देत आहेत.

भाजप आणि आरएसएसला जय सियाराम म्हणण्याचा सल्ला राहुल यांनी दिला. तसेच जय श्री राम आणि जय सियाराममधील फरकही सांगितला. भाजपवाले सियाराम आणि सीताराम म्हणू शकत नाहीत, कारण त्यांच्या संघटनेत एकही महिला नाही. त्यांच्या संघटनेत सीता येऊ शकत नाही, कारण सीतेला त्यांनी हाकलून दिले आहे, असे म्हणत त्यांनी आरएसएसवर टीका केली.

पहाटे पाच वाजल्यापासूनच भारत जोडो यात्रेच्या शिबिरात हालचाली सुरू होत्या. यात्रेत सहभागी होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येऊ लागले.
पहाटे पाच वाजल्यापासूनच भारत जोडो यात्रेच्या शिबिरात हालचाली सुरू होत्या. यात्रेत सहभागी होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येऊ लागले.

आजचे मोठे अपडेट

  • सकाळी 6 वाजता झालावाड क्रीडा संकुल येथून यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी राहुल यांनी झालावाड भाजप कार्यालयात उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन केले आणि फ्लाइंग किस देऊन पुढे गेले.
  • सकाळी 10 वाजता ही यात्रा झालरापाटणच्या देवरी घाटावर पोहचली. देवरीघाटा येथे यात्रेचा लंच ब्रेक झाला.
  • यानंतर प्रवासाचा दुसरा टप्पा कोटा येथील सुकेत येथून दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. सायंकाळी साडेसहा वाजता ही यात्रा रामंगजच्या हिरिया खेडी येथे पोहोचेल. येथे उद्याच्या यात्रेचा शेवटचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर दर्रा येथील मोरू कलान क्रीडा मैदानावर यात्रा रात्रीचा विसावा घेईल.
  • यात्रेदरम्यान राहुल गांधी निवडक शेतकरी, मजूर आणि सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. पहिल्या दिवशी झालावाड जिल्ह्यातही राहुल गांधींनी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची भेट घेतली होती.

राजस्थानमधील यात्रेचा आजचा दुसरा दिवस, पाहा काही खास फोटो...

राहुल यांच्यासोबत दोन अपंगही यात्रेत दिसले.
राहुल यांच्यासोबत दोन अपंगही यात्रेत दिसले.
झालावाडमध्ये यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राजस्थानी कलाकार आपली कला सादर करत आहेत. यादरम्यान राहुल यांनी कठपुतली चालवण्याचा प्रयत्न केला.
झालावाडमध्ये यात्रेच्या दुसऱ्या दिवशी राजस्थानी कलाकार आपली कला सादर करत आहेत. यादरम्यान राहुल यांनी कठपुतली चालवण्याचा प्रयत्न केला.
इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहचले. भारत जोडो यात्रेच्या आतापर्यंतच्या प्रवासात राजस्थानमध्ये सर्वाधिक गर्दी पाहायला मिळेल, अशी राजस्थान काँग्रेसला आशा आहे.

राहुल गांधींनी झालावाडच्या स्थानिक मुलींशीही संवाद साधला.
राहुल गांधींनी झालावाडच्या स्थानिक मुलींशीही संवाद साधला.
राहुल गांधी यांच्या यात्रेतून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला असलेल्या झालावाडमध्ये मोठी ताकद दाखवली आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेतून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला असलेल्या झालावाडमध्ये मोठी ताकद दाखवली आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्यात सीएम गेहलोत यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खचरियावास, कृष्णा पुनिया आणि वैभव गेहलोतही दिसले.
राहुल गांधींच्या दौऱ्यात सीएम गेहलोत यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खचरियावास, कृष्णा पुनिया आणि वैभव गेहलोतही दिसले.
प्रवासानंतर विश्रांतीसाठी मोठे घुमट करण्यात आले आहेत. यामध्ये राहण्यापासून आंघोळीपर्यंतची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवासानंतर विश्रांतीसाठी मोठे घुमट करण्यात आले आहेत. यामध्ये राहण्यापासून आंघोळीपर्यंतची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सोबत अनेक रुग्णवाहिकाही होत्या.
यात्रेच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सोबत अनेक रुग्णवाहिकाही होत्या.
राजस्थानमध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी लोकांना संबोधित करताना राहुल गांधी
राजस्थानमध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी लोकांना संबोधित करताना राहुल गांधी
पहिल्या दिवसाच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांशी संवाद साधला आणि प्रतिक्रियाही घेतल्या.
पहिल्या दिवसाच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांशी संवाद साधला आणि प्रतिक्रियाही घेतल्या.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पाहण्यासाठी लोक बसच्या छतावर चढले.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पाहण्यासाठी लोक बसच्या छतावर चढले.
ढोल-ताशांच्या गजरात भारत जोडो यात्रा सुरू आहे.
ढोल-ताशांच्या गजरात भारत जोडो यात्रा सुरू आहे.
राहुल गांधींच्या स्वागतासाठी राजस्थानी कलाकारही ठिकठिकाणी आपली कला सादर करताना दिसून आले.
राहुल गांधींच्या स्वागतासाठी राजस्थानी कलाकारही ठिकठिकाणी आपली कला सादर करताना दिसून आले.
राहुल गांधींचे फोटो काढताना महिला दिसून आल्या.
राहुल गांधींचे फोटो काढताना महिला दिसून आल्या.
झालावाडमध्ये प्रवासादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून आली. राहुल गांधी यांनी हस्तांदोलन करून सर्वांना अभिवादन केले.
झालावाडमध्ये प्रवासादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून आली. राहुल गांधी यांनी हस्तांदोलन करून सर्वांना अभिवादन केले.

राजस्थानमध्ये 'भारत जोडो यात्रा'चे पहिला दिवस

राहुल गांधी राजस्थानमध्ये यात्रेच्या पहिल्या दिवशी 34 किलोमीटरचे अंतर कापले. भारत जोडो यात्रेत आतापर्यंत सरासरी 24 किलोमीटरचा प्रवास केला जात होता. मात्र आता राजस्थानमध्ये वेग वाढवला जात आहे. यात्रेत काँग्रेसची सर्व शिबिरे एकत्र दिसत होती. गेहलोत-पायलट या दोघांचेही समर्थक यात्रेत सहभागी होत आहेत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारत जोडो यात्रेचा उद्याचा मार्गा असा असेल.
भारत जोडो यात्रेचा उद्याचा मार्गा असा असेल.
बातम्या आणखी आहेत...