आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरप्रदेशमध्ये 'भारत जोडो यात्रे'चा बुधवारचा दुसरा दिवस आहे. राहुल-प्रियांकासोबतचा प्रवास बागपतमधील मावी कलान येथून सकाळी 6.15 वाजता सुरू झाला. प्रथम राष्ट्रगीत, त्यानंतर तिरंगा फडकवण्यात आला. तर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आज 48 किलोमीटरचा यात्रेचा प्रवास स्थलांतरींतासाठी प्रसिद्ध असलेल्या शामली जिल्ह्यातील कैरानातून जाणार आहे. राहुल आणि प्रियंका सकाळी 5.30 वाजता दिल्लीहून मावी कलान येथे पोहोचले आणि येथून यात्रेत सहभागी झाले.
राहुल गांधी कैराना येथून रवाना होतील
बुधवारी मावी कलान येथून सुरू झालेली ही यात्रा बागपत, सिसाना, सरूरपूर, बारोट मार्गे शामली येथील आलम शहरात पोहोचेल. रात्रीचा मुक्काम या ठिकाणी होईल. याआधी बारोटमध्ये एक बैठक होणार आहे, ज्याला राहुल व प्रियंका गांधी संबोधित करतील, मात्र, आलमपूर्वी कसबा कैराना या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण एवढी मोठी जागा मिळू शकली नाही, कारण यात्रेत 60 कंटेनर आणि 10,000 कार्यकर्त्यांना राहण्याची व्यवस्था होणार नाही. त्यामुळे अखेर आलममध्ये ही यात्रेचा मुक्काम ठरविला गेला. अखिलेश सरकारमधील कथीत स्थलांतरामुळे शामली जिल्ह्यातील कैराना हे शहर देशभर चर्चेत आले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशातील स्थलांतराचा मुद्दा बराच गाजला होता.
25 किमीचा प्रवास करून राहुल दिल्लीला परतले
25 किलोमीटरचा प्रवास करून राहुल गांधी एका दिवसांपूर्वी दिल्लीला परतले होते. त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था बागपत येथील हरी कॅसल रिसॉर्टमध्ये करण्यात आली होती. इतर प्रवासी पायी माविकला गावापर्यंत आले होते. सुमारे 6,000 लोकांनी सुमारे 2 लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या जर्मन हँगरमध्ये (वॉटर प्रूफ टेंट) मुक्काम केला आणि रात्र काढली.
बागपतमधून आरएलडी एकत्र येणार, खाप चौधरींचाही समावेश असेल
बागपतचे आरएलडी जिल्हाध्यक्ष रामपाल धामा यांनी सांगितले की, "राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या सूचनेनुसार 4 जानेवारीला बागपतमध्ये भारत जोडो यात्रेचे स्वागत केले जाईल. या यात्रेत पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दुसरीकडे, यूपीमध्ये या यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी जयंत चौधरी यांनी ट्विट केले की, "पृथ्वीची वीट तपश्चर्या केल्यावरच आकाशाला भिडते. भारत जोडो यात्रेतील तपस्वींना वंदन. उत्तर प्रदेशात सुरू असलेली ही मोहीम सार्थक होवो आणि देशाच्या संस्कृतीशी जोडून लोकांना एका धाग्यात जोडत राहो.
यासंबंधित अन्य बातम्या वाचा
राहुल योद्धा, सत्याचा मार्ग सोडणार नाही:प्रियंका म्हणाल्या - अदानी-अंबानींनी मोठ-मोठे नेते खरेदी केले, पण राहुलला करता आले नाही
प्रियंका गांधी म्हणाल्या की- "माझा मोठा भाऊ... राहुलचा मला सर्वाधिक अभिमान आहे. सत्तेतील लोकांनी पूर्ण ताकद लावली. करोडोंचा खर्च करून माझ्या भावाची प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न केला.पण माझा भाऊ योद्धा आहे... योद्धा...! अदानी-अंबानींनी मोठे मोठे नेते विकत घेतले पण राहुलला ते खरेदी करू शकले नाही. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.