आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bharat Mein Badhte Apradh: Crime During Coronavirus Lockdown In India And Employment Situation Connection; News And Live Updates

दिव्य मराठी ओरिजनल:कोरोना महामारीपासून त्रस्त लोकही गुन्हेगारांच्या निशाण्यावर; लॉकडाऊनदरम्यान अनेक गुन्हेगार होते बेरोजगार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरगुती हिंसा आणि आर्थिक गुन्हेगारीत वाढ

कोरोना महामारीने गेल्या वर्षीपासून कित्येक लोकांना बेरोजगार बनवले आहे. ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ORF)नुसार, कोरोना काळात सामान्य लोक हे लॉकडाऊनमुळे त्रस्त होते. तर दुसरीकडे, अनेक गुन्हेगार त्यांना आपल्या निशाण्यावर घेत होते. या अवहालानुसार, लॉकडाऊन काळादरम्यान अनेक गुन्हेगारही बेरोजगार होते. दरम्यान, या काळात स्त्रियांवरील अत्याचारासोबतच, हिंसा आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फाऊंडशेनच्या अवहालाचे म्हणणे आहे की, कोरोनाकाळात गुन्हेगारी वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे बेरोजगारी आहे.

कोरोना महामारीमुळे जगातील 11.5 कोटी लोक गरीबी आणि बेरोजगारीमध्ये ढकलले गेले आहे. यूनायटेड नेशन्स ग्लोबल पल्स इनिशिएटिव्हच्या अवहालानुसार, 2021 पर्यंत याची संख्या 15 कोटी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वीस वर्षात पहिल्यावेळेस एवढी मोठी बेरोजगारी वाढली आहे. यामुळे गुन्हेगारीच्या घटनेमध्ये आणि बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

घरगुती हिंसा आणि आर्थिक गुन्हेगारीत वाढ
गेल्या वर्षी भारताच्या बेरोजगारीचा दर 27% एवढा होता. परंतु, यामध्ये सर्वात घरगुती हिंसा, वेतन विवाद, रेशन, थेट लाभ आणि दिवाळखोरीशी संबंधित आहे. यामध्ये घरगुती हिंसा सोडून इतर सर्व गुन्हे आर्थिक स्वरुपाचे आहे. लॉकडाऊन दरम्यान, न्यायपालिकाही कोविडमुळे काही बंद असल्यामुळे याची तीवत्रा आणखी वाढत गेली.

बातम्या आणखी आहेत...